राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भीम प्रतिष्ठानला प्रदान!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीम प्रतिष्ठानचे सूर्यकांत बाबरे, वीरेंद्र हिंगमिरे यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
सोलापूर, :-विवेक विचार मंचतर्फे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चौथे राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विवेक विचार मंचातर्फे दिला जाणारा राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय हा राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीम प्रतिष्ठानचे संस्थापक सूर्यकांत (बाबा) बाबरे व अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांना प्रदान करण्यात आला. शाल,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. समता, बंधुता, न्याय या तत्त्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री शिंदे यांनी भीम प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
♦
यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही भीम प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील वंचित घटकासाठी काम करणारी संस्था म्हणून सोलापूरच्या भीम प्रतिष्ठानची ओळख आहे. त्याचेच फलित म्हणून आज भीम प्रतिष्ठानचा सन्मान करताना विवेक विचार मंचला आनंद होत असल्याचे मंचचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी सांगितले.
यावेळी कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे, महेश पोहनेरकर, अश्विनी चव्हाण, किशोर कांबळे, भीम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड .विशाल मस्के, अकबर शेख, सिध्दांत बाबरे, सुनील धरणे, ऍड स्वाती मस्के आदी उपस्थित होते.