प्रा.भास्कर बंगाळे यांच्या “वाटणी” कथासंग्रहास पुरस्कार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-‘संस्कृती प्रकाशन, पुणे‘ यांनी प्रकाशित केलेल्या प्रा.भास्कर बंगाळे यांच्या ‘वाटणी’ कथासंग्रहास जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे- शाखा अहमदनगर’ आयोजित ‘स्व.आ. राजीव राजळे साहित्य गौरव पुरस्कार- २०२४’ चे वितरण समारंभ ‘कोहिनूर मंगल कार्यालय, अहमदनगर’ येथे रविवार दि.०७/०७/२०२४ रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ‘म.सा.प.पुणे’च्या कार्यवाह सौ. सुनीताराजे पवार होत्या तर पुरस्कार वितरण आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष हिवरे बाजार गावचे सरपंच .पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्रामभैय्या जगताप, आ. सत्यजित तांबे, . जयंत येलूलकर, मा. किशोर मरकड, सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक सुरेश पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कादंबरी, कथा, कविता, चरित्र व संकीर्ण साहित्य प्रकारातील पुरस्कार प्राप्त लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास साहित्यिक व साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. भास्कर बंगाळे यांचे पाच कथासंग्रह, स्वकथन, एक कादंबरी, एक संपादित ग्रंथ आदी साहित्य प्रकाशित असून त्यांच्या साहित्यास एकूण ३१ पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी ‘वाटणी‘ कथासंग्रहास हा बारावा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. भास्कर बंगाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.