Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी गोविंद सकट

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सांगोला:-[ पाचेगाव बुद्रुक] पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगोला ग्रामीण तालुकाध्यक्षपदी [पाचेगाव बुद्रुक] येथील गोविंद सोपान सकट यांची निवड झाली असून राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र वरिष्ठ तालुकाध्यक्ष भीमराव [अण्णा]गडहिरे यांनी नुकतेच त्यांना दिले.
त्यांचे निवडीमुळे पंचक्रोशीत कौतुक होत असून निवडीनंतर बोलताना गोविंद सकट म्हणाले समाजातील तळागाळातील लोकांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे अजूनही समाज चाकोरीचे जीवन जगत आहे.समाजामध्ये प्रबोधन करून21 व्या शतकामध्ये वावरत असताना सर्वच क्षेत्राची माहिती असणं खूप महत्त्वाचे असून तालुक्यामध्ये समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close