Uncategorized

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत

उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांचे आदेश

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (दि.२०) आषाढी एकादशी मुख्य सोहळा दि. 25 जुलै रोजी संपन्न होणार आहे. यात्रा कालावधी 15 जुलै 29 जुलै असा आहे. या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात लाखो भाविक दाखल होत असल्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार तसेच सार्वजनिक हित लक्षात घेऊन, यात्रा कालावधीत सर्व खाजगी दवाखाने रुग्णालय क्लिनिक सुरू ठेवण्यात बाबतचे आदेश उपविभाग दंडाधिकारी सचिन इथापे यांनी जारी केले आहेत.

पंढरपूर शहर व परिसरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये, क्लिनिक व नर्सिंग होम यांनी यात्रा कालावधीत नियमित वेळेत सेवा सुरू ठेवावीत. कोणत्याही कारणास्तव दवाखाना,रुग्णालय बंद ठेवू नयेत.आपत्कालीन रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत.
आवश्यकतेनुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध ठेवून औषधसाठा व आपत्कालीन सुविधा कार्यरत ठेवाव्यात.
तसेच यात्रा कालावधी संपेपर्यंत वैदयकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचर यांनी पंढरपूर शहर सोडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

सदर निर्देशांचे पालन न करणाऱ्या संस्था व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील लागू तरतुदीनुसार तसेच इतर प्रचलित कायद्यानुसार आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

०००००००

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close