13व्या शतकपासून संतांनी मंदिर मुक्तीचा लढा सुरु केला –डॉ. भारत पाटणकर
पंढरीत विठोबा रखुमाई मुक्ती दिन उत्सहात साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरीच्या पांडुरंगाना बडव्याच्या ताब्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न 13व्या शतकपासून संत नामदेवापासून सुरु झाला असून संत चोखामेळा सह अनेक संतांना संघर्ष करावा लागला. संतांना फार त्रास सोसावा लागला प्रसंगी जीव द्यावा लागला. या संत परंपरेचा इतिहास विसरू नये असे मनोगत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. ते विठोबा-रखुमाई मुक्ती दिनचा दशकपूर्ती सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
विठोबा-रखुमाई मुक्ती आंदोलन, पंढरपूर यांनी “विठोबा-रखुमाई मुक्ती दिनचा दशकपूर्ती सोहळा ‘ बुधवार दि. १७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला होता.सकाळी ११ नामदेव पायरी, पंढरपूर येथे महाआरती संपन्न झाली. त्यानंतर दुपारी १२ वा. ३० मि. संत तुकाराम भवन येथे दशकपुर्ती सोहळा मोठ्या उत्सहाने साजरा झाला.
पुढे साने गुरुजी अनेक पुरोगामी लोकांनी मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला. तरीही ते पूर्ण यश आले नव्हते.10वर्षांपूर्वी बडवे, उत्पात व सेवेकरी यांच्या ताब्यातून मंदिर मुक्त करून शासनाने ताब्यात घेतले. त्याचा आज दशकपूर्ती सोहळा आज होत आहें ही आनंदाची बाब आहें. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मंदिर सरकारचे ताब्यातून काढून पूर्वीच्या लोकांना दिली पाहिजे अशी याचिका दाखल केली आहें त्या साठी सर्व वारकरी लोकांनी सतर्क राहणे महत्वाचे आहें.त्यासाठी नियोजनबद्द आखणी करून पंढरपूरात मोठी वारकरी परिषद घ्यावी लागेल.असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवारांनी मनोगते व्यक्त केली.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुहास महाराज फडतरे (प्रदेशाध्यक्ष, नामदेव-तुकाराम वारकरी परिषद)म्हणाले धर्माच्या नावावर आज दिशाभूल केली जात आहें. सर्व धर्म मानवतावादी आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी भारत महाराज जाधव (विश्वस्त श्री संत कैकाडी महाराज मठ) अॅड. किरण मुरलीधर घाडगे (कायदेशीर सल्लागार) शिवमती सुमनताई पवार संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर (राष्ट्रीय अध्यक्ष, श्रमिक मुक्तीदल) हें होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले. तर आभार बाळासाहेब बागल यांनी केले.