Uncategorized

प्रा. शिवाजीराव वाघमारे यांना” शिवगौरव पुरस्कार “जाहीर

राणा प्रताप ग्रुपचा शिवगौरव पुरस्कार व शिवजयंती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 27 फेब्रुवारीला

  • जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-राणा प्रताप ग्रुप, पंढरपूर  यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित शिवगौरव पुरस्कार व शिवजयंती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. २७।०२।२०२४ रोजी सायं. ६.०० वाजता हॉटेल विठ्ठल इन, जुन्या एस. टी. स्टँड समोर, पंढरपूर आयोजित केला असून “जडण घडण ” कार जेष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजीराव वाघमारे  यांचेसह  विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहें.

पारितोषिक वितरण उमेशराव परिचारक (चेअरमन, युटोपियन शुगर्स, कचरेवाडी ता. मंगळवेढा) यांचे शुभहस्ते  होणार असून अध्यक्षस्थानी  जीवन पाटील सर (साहित्यिक, निवृत्त मुख्याध्यापक, मातुःश्री सखुबाई कन्या प्रशाला) हें असणार आहेत. तर   ह.भ.प. बाळासाहेब देहूकर महाराज (जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज) हें प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शिवगौरव पुरस्कार

आरोग्य – डॉ. श्री. शितल शहा

क्रीडा – श्री. नागेश साळुंखे

शिक्षण – प्राचार्य श्री. सुधाकर पिसे सर

समाजसेवा – श्री. दीपक टापरे सर

आदर्श माता – सौ. मुक्ता दत्तात्रय म्हसे

साहित्य – श्री. शिवाजीराव वाघमारे सर

आदर्श संस्था – रनर्स ग्रुप, पंढरपूर

यांना जाहीर झाला आहें.

तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राणा प्रताप ग्रुप, यांनी केले आहें.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close