Uncategorized

–अन्यथा मैला मिश्रीत चंद्रभागेचं पाणी पंतप्रधान मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना कमंडलू मध्ये पाठविणार – गणेश अंकुशराव

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी)- लाखो साधुसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे 65 एक एकर परिसरातील शौचालय व आजूबाजूच्या मठातील शौचालयातील सांडपाणी चेंबर मधून डायरेक्ट चंद्रभागेच्या पात्रात मिसळत आहे, त्यामुळे लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रभागेच्या पवित्र पाणी दूषित होत आहे.

लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून चंद्रभागेत मिसळणार पाणी बंद न केल्यास आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागेचं पाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व संबंधित मंत्र्यांना कमांडलूमध्ये पाणी पाठविणार असा इशारा आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

हे मैला मिश्रित पाणी चंद्रभागेच्या पात्रात मिसळत असल्यामुळे अनेक भाविकांच्या भावना दुखवणारा कृत्य नगरपालिका करत आहे. हे घाण पाणी मिसळल्यामुळे चंद्रभागा पूर्ण दूषित झालेले आहे. हजारो भाविक भक्त चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करतात तसेच पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात त्याच बरोबर आपल्या घरी पूजन करण्यासाठी चंद्रभागेचे पाणी घेऊन जातात. जर असे मैला मिश्रित पाणी तीर्थ म्हणून सेवन केल्यामुळे भाविक भक्त आजारी पडतील. त्यामुळे तात्काळ याची दखल घेऊन चंद्रभागेमध्ये होत, असलेलं मैला मिश्रित पाणी तात्काळ थांबवावे, अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close