Uncategorized

जप्त वाळू साठ्याचा २९नोव्हेंबरला लिलाव

प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची माहिती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

             पंढरपूर दि. 18 :-  मंगळवेढा तालुक्यात जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलाव सोमवार दिनांक  29 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी दिली आहे.

 मंगळवेढा तालुक्यातील मौजे सिद्धापूर येथील सन 2018-19 मधील प्रस्ताविक संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील 610.20  ब्रास वाळू साठा शिल्लक असून, वाळू साठ्याची शासकीय किंमत सुमारे 22 लाख 57 हजार 740 इतकी आहे.  ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावयाचा आहे. अशा व्यक्तींनी संबंधित ठिकाणच्या वाळू  साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी शुक्रवार  दिनांक 26 नोव्हेंबर 2021  रोजी सायंकाळी 5.00  वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा येथे सादर करावेत, असेही प्रांताधिकारी संमिंदर यांनी सांगितले.

सदर लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम रोख अथवा  डी . डी.द्वारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये दोन हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची २५ टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाद्वारे जमा करावी. तसेच बोलीच्या रक्कमेव्यतिरीक्त  गौण खनिज  निधी रक्कम १० टक्केचा धनादेश कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. बोलीची उर्वरित ७५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात सात दिवसाच्या आत भरल्यानंतर स्वतःकडील वाहनाद्वारे संबंधित ठिकाणावरून वाळू घेऊन जावी. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच नमूद ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री .समिंदर यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close