Uncategorized

स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवारी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर करणार फेसबुक लाईव्हद्वारे बहुमोल मार्गदर्शन

छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी चिन्ह व प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवार, दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर यांचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.’ अशी माहिती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सध्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू आहे. यासाठी बारावी सायन्स शाखेमधून उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून या महत्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे मार्गदर्शन सत्र रविवार, दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून www.facebook.com/svericampus/live/ या लिंकवरून होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या वर्षी देखील लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात प्रवेशासंबंधी विविध प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी त्यांचा होणारा संभ्रम व अडचणी लक्षात घेवून अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षणातील प्रदीर्घ अनुभव असणारे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर यांचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, कॅप राऊंडस, विविध शाखांची निवड, प्रवेश प्रक्रिये दरम्यान घ्यावयाची काळजी, विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आदी बाबत सविस्तर चर्चा/मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने खास विद्यार्थी व पालकांसाठी या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या मार्गदर्शन सत्राचा विद्यार्थी व पालकांनी अवश्य लाभ घ्यावा.’ असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे देखील आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close