माढा मतदार संघात 12 लाख ओबीसी मते मलाच मिळणार–प्रा. लक्ष्मण हाके
मात्तब्बर उमेदवारांना जनतेच्या प्रश्नाची जाण नाही....त्यामुळे माझा विजय निश्चित आहें

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-लोकसभा अस्तित्वात आले पासून धनगर समाजाचा लोकनियुक्त एक ही प्रतिनिधी लोकांसभेत निवडून गेला नाही. माढा मतदार संघात धनगर समाजाच्या मतांसोबतच ओबीसी भटक्याची 12ते 13लाख मते असूनही यापैकी एकालाही महायुती अथवा महा आघाडी कडून उमेदवारी दिली नाही. शरद पवार यांनी सुरुवातीला महादेव जानकर व नंतर डॉ.अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देण्याचे वातावरण केले पण ऐनवेळी पक्ष प्रवेश देऊन धैर्यशील मोहिते यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मी शिवसेना उबाठाचा त्याग करुन ओबीसी पक्षांकडून आपण उमेदवारी दाखल केली असून ही मते मलाच मिळून मी विजयी होणार असल्याचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रकारभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी बाबा चव्हाण, ऍड. प्रशांत रुपणर आदी उपस्थित होते.
बाकीचे उमेदवारांना मतदार संघातील प्रश्नाची जाण नाही तर काही गुन्हेगार गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत. माझ्याकडे निवडणुकीसाठी लागणारी साधने कमी असली तरी मतदारच मला आर्थिक सहकार्य करीत आहेत.
विधानसभा व लोकसभेत निवडून जाणेसाठी obc साठी राखीव मतदार संघ नाहीत त्यामुळे कायदेमंडळात प्रतिनिधी जाऊ शकत नाहीत.हाके आडनाव बघून उमेदवारी डावलली जाते हें येथील वास्तव आहें. 60%असणाऱ्या समुदायला डावलून केलेले राजकारण इथून पुढे चालणार नाही. मतदार सुज्ञ झाला असून आत्ता फक्त चिन्ह न बघता नाव वाचून मतदान करीत आहें. कोणाचाही दबाव आला तरी मी निवडणूकितून माघार घेणार नाही. मी चळवळीतील कार्यकर्ता आहें.असे शेवटी सांगितले.



