माढा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पार्टीचे स्वरुपकुमार जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
सोलापूर :-माढा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार स्वरुपकुमार जानकर यांचा उमेदवारी अर्ज आज दिनांक १९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आला , यावेळी बहुजन समाज पार्टी चे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा पुणे झोन प्रभारी आप्पासाहेब लोकरे ,तसेच बसपा जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे , विक्रम ढोणे साहेब, डॉ. प्रसाद ओंबासे तसेच अन्य बसपा पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापुर येथे उपस्थित होते.
सदर आर्ज दाखल करणेसाठी बसपा जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड,सातारा जिल्हा प्रभारी किरण सावंत ,, जिल्हा उपाध्यक्ष तिपन्ना लोहार साहेब, जिल्हा महासचिव अशोक नाना ताकातोडे,. विलास शेरखाने सो बार्शी विं निरीक्षक, सोलापूर शहर अध्यक्ष राहुल सर्वागोड , जिल्हा कोषाध्यक्ष प्रशिक माने, ,माढा वि प्रभारी श्रीकृष्ण प्रक्षाळे, पंढरपूर वी अध्यक्ष सुरेश शिंदे , बामसेफ संयोजक,गौतम साबळे , कालिदास गवळी , ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश वाघमारे सो( माण), तसेच अन्य सेक्टर कार्यकर्ते उपस्थित होते.
२४३ माढा लोकसभा उमेदवार ,मां .स्वरूपकुमार जानकर साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरलेनंतर उपस्थित सर्व सोलापूर व सातारा जिल्हा,विधानसभा पदाधिकारी यांच्याशी हितगुज करताना,उमेदवार जानकर साहेब तसेच ,पुणे झोन प्रभारी आप्पासाहेब लोकरे ,जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे ,तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी बांधव….