Uncategorized

तलावाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा—जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर,: तलावातील साठवण क्षमता वाढवण्याबरोबरच तलावावरील असलेल्या लहान बंधाऱ्याचे पाणी शेवटपर्यंतच्या शेतकऱ्याला कसे मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

माळशिरस तालुक्यातील कोळेगाव, सुळेवाडी, गारवाड येथील तलावाची पाहणी श्री पाटील यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता संजय बोडके, उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय एकतपुरे, पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी अनंत पासलकर, तसेच संबंधित गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले, माळशिरस तालुक्यातील वीस ते बावीस गावे दुष्काळी पट्ट्यातील असून ती गावे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्या गावांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता व्हावी. यासाठी तलावात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन करून नीरा उजव्या कालव्याच्या पाण्याची उपलब्धता पाहून ते पाणी आणता येईल का याबाबत अभ्यास करून आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल.

गारवड भांडे वस्ती येथील तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ९.९३ द.घ.ल. फू इतकी असून या तलावावर सध्या 42 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. तसेच गवळ खोरा येथील तलावाची ११द.घ.ल. फू पाणी साठवण्याची क्षमता असून 40 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. तलावाची गळती थांबवण्यासाठी जलसंधारण विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच सुरवाडी येथील तलावाची पाणी साठवण क्षमता १५ द.घ.ल. फू असून सिंचनाखालील क्षेत्र ४२हेक्टर इतके आहे. या तलावात नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडल्यास शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल यासाठी पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली.

कोळेगाव तलावाची लांबी ८४५ मीटर तर उंची ४.७६ मीटर इतकी आहे. तलावातील पाण्याची साठवण क्षमता ४.७६ द.घ.ल. फू एवढी आहे. या तलावाच्या वड्यावर ७ बंधारे असून , तलावातील पाण्यामुळे कोळेगांव, शिंगोर्णी, महिम या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार असून या भागातील ५५३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तलाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नीरा उजव्या कालव्यातून या तलावात पाणी सोडण्याबाबतचे नियोजन जलसंपदा विभागाने करावे ,अशी मागणी संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close