डॉ.वामन साळवे यांची माहिती अधिकार उत्कृष्टता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-माहिती अधिकार अभ्यासक व लेखक प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांची गोवा शिक्षक विकास परिषदेचा माहिती अधिकार उत्कृष्टता राष्ट्रीय पुरस्कारासाठी.( Right to Information ( RTI) Excellence National Award 2024) निवड झाली आहे.यासंबंधी शिक्षक विकास परिषदेचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी , बेळगाव ( कर्नाटक) यांनी पुरस्कारासाठी निवड झालेचे अभिनंदन पत्राद्वारे डॉ. साळवे यांना कळविले आहे.शिक्षक विकास परिषदेचे दि. १६-१७ नोव्हेंबर२०२४ रोजी शिरोडा (गोवा)येथे आयोजित केलेल्या २८ वे राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशनातील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ.वामन साळवे यांना माहिती अधिकार उत्कृष्टता राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रीत केले आहे.