Uncategorized

योगशिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अशोक ननवरे यांची फेरनियुक्ती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर – योगा फाऊंडेशन संचलित महाराष्ट्र, योगा शिंक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी योगाचार्य अशोक ननवरे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

अशोक ननवरे हे सातत्याने सन १९९० पासून योग प्रचार-प्रसार व योग शिक्षणात कार्यरत आहेत. योग विद्या गुरुकुल नाशिक या विद्यापीठाने त्यांना योगाचार्य पदवी देऊन सन्मानित त्यांनी मानसशास्त्रात बी. ए.केले असून योग शास्त्रात एम. ए. पूर्ण केले असून आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त योगशास्त्रात पदविका व पदवी चे शिक्षण पूर्ण करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यावीठाच्या योगा शिक्षक पदविका अभ्यास केंद्राचे पंढरपूर येथील योग महविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पहातात, त्यांनी सोलापुर जिल्हयात ५०० पेक्षा जाऊ शासन मान्य योग शिक्षक घडविले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद सोलापूर मध्ये आरोग्य अभियान अंतर्गत १००पेक्षा जास्त योगशिक्षकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. त्यांचे हे भरीव कार्य पाहून योगशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार यांनी त्यांची सोलापुर जिल्ला अध्यक्षपदी फेर नियुक्ती केली असून विभागीय अध्यक्ष प्रा सदानंद वाली व योग विद्या धाम परिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले आहें.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close