महिलांना व दूर्बलांना सर्वच क्षेत्रात समान वाटा व अधिकार मिळाले तरच “समता” प्रस्थापित होईल-प्रा.सुभाष वायदंडे
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पंढरीत "समता "मेळावा संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर:- महिलांच्या बरोबर समाजातील जे दुर्बल व वंचित घटक आहेत यांना सत्तेत, राजकीय, आर्थिक, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रात समान वाट्या बरोबरच समान अधिकारही मिळाले तरच देशात संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक “समता” प्रस्थापित होईल अन्यथा हे विषमतेचं हेे झाड वटवृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले. ते सोलापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आयोजित पंढरपूर येथील विठ्ठल इन सभागृहामध्ये “समता” मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे म्हणाले चळवळ उभी करत असताना खूप कष्ट असतात पण ती जपणं कार्यकर्त्यांच्या हातात असून पुरोगामी संघर्ष परिषद एक आदर्श चळवळ असून मी माझ्या परीने वाटेल ती मदत करायला तयार आहे.
स्वागत सोलापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी केले.
यावेळी राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब चोपडे ,प्रा. कांबळे, शीला बनसोडे जिल्हा सचिव उमेश वाघमारे यांची प्रमुख भाषणे झाली.
प्रमुख उपस्थितीत राज्य महासचिव अर्चना घोरपडे, पंढरपूरचे युवा नेते अमित अवघडे,वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष नेताजीराव अवघडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कांबळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग ऐवळे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कृष्णाजी गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस खंडू कांबळे,सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सविता नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष छाया जाधव, माढा तालुका अध्यक्षा वंदना ओहोळ,पंढरपूर तालुका अध्यक्ष अजिंक्य वाघमारे, पंढरपूर तालुका तालुकाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, बळीराम वाघमारे, गणेश लोंढे, तानाजी रणदिवे, गणेश कांबळे, सदाशिव कसबे, बार्शी शहराध्यक्ष माया जाधव, राजेश जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख आनंद ढावारे, जयश्री कांबळे, वनिता सोनवले,आधिकराव चव्हाण, सुजाता कांबळे, रेणुका बनसोडे, कुमार आदुके, शैनाज इत्यादी पुरोगामी पुरोगामी परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बळीराम वाघमारे यांनी केले.शेवटी आभार पंढरपूर तालुकाध्यक्ष अजिंक्य वाघमारे यानी मानले.


