राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाच्या विविध पदांवर नियुक्त्या जाहीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी जलसंपदा मंत्री, प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाच्या विविध पदांवर आज नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये आज पंढरपूर येथील पक्ष कार्यालयात प्रदेश सदस्य विजय रामचंद्र काळे यांना आज उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक सुधीर भोसले याचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.याप्रसंगी रविंद्र पाटील,ज्ञानेश्वर अवताडे, विनय शिंदे व सोशल मीडियाचे
उदय आदमिले यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी काळे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना काळे यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रदेशवर सदस्य म्हणून सन्मान देण्याचे काम फक्त शरदचंद्रजी पवार यांचे विचाराने प्रेरीत झालेले उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी केले आहे.निश्चितच येणाऱ्या काळात पक्षाची भुमिका, विचार सर्व माध्यमातून घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विजय काळे यांनी सांगितले.