Uncategorized

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन न भिता परीक्षा द्यावी –सुनील अडगळे सर

विनर्स कोचिंग क्लासेस कासेगाव मध्ये इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर -विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन न भिता परीक्षा द्यावी असे विचार सांगुन आपल्या खुमासदार वक्तृत्वातून  कवी , साहित्यिक, वक्ते,   सुनील आडगळे सर सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा जाधववाडी. भोसे तालुका पंढरपूर यांनी विनर्स कोचिंग क्लासेस कासेगाव मध्ये इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला   या कार्यक्रमात प्रमुख  पाहुणे म्हणून ते बोलत होते.त्या क्लास बद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल भरपूर कौतुक केले. त्यांच्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांसाठी हरिवंशराय बच्चन यांची कविता तसेच लढा कविता अशा विविध कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम त्यांनी केले.

 

शिव शाहू फुले आंबेडकर यांचे उदाहरणे देऊन अतिशय सोप्या आणि मार्मिक शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील मनातील भीतीही कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

सुनील अडगळे  महाराष्ट्रभर व्याख्याने देण्याचा योग. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात विद्यार्थी दशेपासून सक्रिय सहभाग. राज्य पातळीवर अनेक कविता लेख प्रकाशित. विद्यार्थी दशेपासून गरिबीच्या परिस्थितीशी संघर्ष. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग, महामानवांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर व्याख्याते म्हणून प्रसिद्ध वक्ते, प्राथमिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील, रोटरी क्लब पंढरपूर यांच्या सहकार्याने श्रीलंका दौरा , ग्रंथाविषयी प्रेम असणारे एक व्यक्तिमत्व, 365 दिवस शाळा भरवण्याचा पंढरपूर तालुक्यात एकमेव प्रयत्न करणारे सर म्हणजे आडगळे गुरुजी होय, गरीब होतकरू कष्टाळू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रत्येक वर्षी करण्याचा उपक्रम आज अखेर सुरू आहे, असे बहुआयामी व्यक्तिमत्व आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले हे आमचे विनर्स कोचिंग क्लासेस चे भाग्यच आहे.असे मनोगत विनर्स चे संचालक अमोल खिलारे सर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांची आरती करून झाली. या शुभेच्छा समारंभाचे इयत्ता 9 च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केले होते. विद्यार्थी मनोगता मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व क्लास बद्दल भरपूर प्रेमाचा वर्ष केला.

क्लासच्या सहशिक्षकांनीही इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी आणि त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी प्रा. हनुमंत लोंढे, प्रा. जयसिंग खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववीच्या विद्यार्थ्यांनी काही मनोरंजनात्मक असे खेळ ठेवले होते या खेळाचाही उत्स्फूर्त आनंद इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आणि गेली वर्षभर अभ्यास करून मानसिक ताण आलेला खेळाच्या माध्यमातून कमी केला.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close