Uncategorized

अण्णा भाऊंची जिवंतपणी आणि मरणोत्तर सुद्धा उपेक्षाच प्रबोधनकारांच्या यादीतून अण्णाभाऊंचं नाव वगळणे म्हणजे मागासवर्गीयांचा अपमान

केंद्र सरकारने जाहीर माफी मागून प्रबोधनकारांची यादी ठरवणारी समितीच बरखास्त करावी- पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

*सांगली*:- दि.४ जानेवारी ज्यांचं साहित्य सातासमुद्राच्या पलीकडे गेलं, ज्या साहित्यानं संपूर्ण जगाला डोकं धरायला लावलं, ज्या साहित्याची खोली आणि हरहुन्नरीता अजूनही आजच्या साहित्यिकांना कळली नाही अशा थोर साहित्यिकाला आणि जन्मजात शाहिराला संपूर्ण जग ओळखत असताना अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व प्रतिष्ठित नाहीत म्हणून केंद्र सरकारने प्रबोधनकारांच्या यादीतून वगळून हा संपूर्ण भारत देशातील मागासवर्गीयांचा जाणूनबुजून केलेला अपमान असून सदर प्रकरणी केंद्र सरकारने मागासवर्गीयांची आणि संपूर्ण भारतवासीयांची जाहीर माफी मागून प्रबोधनकारांची यादी ठरवणारी समिती तडकाफडकी बरखास्त करावी अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात प्रा. वायदंडे पुढे म्हणाले की,
तत्कालीन प्रस्थापितांनी अण्णाभाऊंची जिवंतपणी उपेक्षा केली आणि आता प्रबोधनकारांच्या यादीतून नाव वगळून जातीयवादी असलेल्या केंद्र सरकारने सुद्धा अण्णाभाऊंची मरणोत्तर उपेक्षाच केली असल्याची भावना संपूर्ण मागासवर्गीयांची झाली असल्यामुळे केंद्र सरकार मागासवर्गीयांच्या विरोधी काम करत असल्याची टीकाही केली आहे. सदर समिती बरखास्त न केल्यास व प्रबोधनकारांच्या यादीत अण्णाभाऊंच्या नावाचा समावेश न केल्यास महाराष्ट्रामध्ये एकाही केंद्रीय मंत्र्याला पाय ठेवू देणार नसल्याची भूमिका पुरोगामी संघर्ष परिषदेचे असल्याची प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close