दोन दादा आणि एक आबा श्री विठ्ठल साखर कारखान्यावर कोण मिळवणार ताबा?.

भगिरथ भालके
अभिजीत पाटील
युवराज पाटील
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर(राजेंद्र काळे) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चौरंगी नव्हे तिरंगी लढत होणार असे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. नुकत्याच झालेल्या युवराज पाटील यांच्या विचारविनिमय बैठकीमध्ये सर्व सभासद तसेच व्यापारी कामगार यांनी एक मताने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्वतंत्र लढवावी असे ठरले. काही दिवसा पासून पंढरपूर तालुक्यांमध्ये एक चर्चा सुरू होती ती म्हणजे भगीरथ भालके आणि युवराज पाटील हे सत्ताधारी गटातील संचालक मंडळी असल्यामुळे भगीरथ भालके आणि युवराज पाटील हे एकत्र निवडणूक लढवतील असे लोकांना वाटत होते. या दोघांचे विरोधक अभिजीत आबा पाटील यांच्या श्रीविठ्ठल परिवर्तन पॅनल ला देखील वाटत होते की भालके आणि युवराज पाटील हे एकत्र निवडणूक लढवल्या नंतर आपल्याला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त होईल. अशी या अभिजीत पाटील गटाची मनोधारणा होती. या मनो धारणेला युवराज पाटील यांनी छेद दिल्याचे दिसून येत आहे. आताही श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चौरंगी किंवा दुरंगी होणार नसून आता ती तिरंगी होणार आहे हे आज रोजी स्पष्ट झाले.
पंढरपूर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कै. औदुंबर आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित तसेच अनेक काटकसरीचा मार्ग अवलंबून शेतकरी सभासद तसेच कामगार ऊस वाहतूक दार या कारखान्याच्या या महत्त्वाच्या घटकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे कार्य औदुंबर आण्णा पाटील यांनी केले.कै. औदुंबर आण्णा पाटील यांच्या मृत्यूनंतर हा कारखाना भालके तसेच काळे या मातब्बरांच्या ताब्यात कारखाना गेला. यांच्या ताब्यात कारखाना गेल्यानंतर काही वर्ष सुरळीत चालणारा हा कारखाना म्हणजे पंढरपूर तालुक्याचा आमदार ठरवणारा कारखाना म्हणून ओळखला जाऊ लागला. या कारखान्याचे माजी चेअरमन भारत भालके यांनी तीन वेळा आमदार की भूषवली परंतु विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकां च्या उसाला भाव हा चांगल्या प्रतीचा देऊ शकले नाहीत. तसेच कालांतरानंतर या ऊस उत्पादकांची तसेच कामगारांचे तसेच ऊस वाहतूकदारांची बीले देखील थकवले गेल्याचे दिसून आले आहे. श्री विठ्ठल सहकारी कारखाना कर्जाच्या दिशेने वाटचाल सुरू होताच कित्येक ऊस उत्पादक सभासदांना वाटत होते, कि कारखान्यांची आर्थिक परिस्थिती आज सुधारेल उद्या सुधारेल परंतु सत्ताधारी गटाने या आर्थिक सुधारणा मध्ये काहीही प्रगती केली नाही. हेच दिसून आले आहे. ऊस उत्पादकांची थकीत बिले तसेच कामगारांचे थकीत वेतन अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नाला निवडणुकीचे हत्यार म्हणून आज घडीला अभिजीत पाटील यांनी प्रचार दौर्यात विचारविनिमय बैठकीमध्ये आपल्या श्रीविठ्ठल परिवर्तन पॅनल या गटाच्या माध्यमातून ऊस उत्पादकांच्या सामोरे जात आहे. हे चित्र सद्यस्थितीला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिसून येत आहे.
सत्ताधारी गटाचे भगीरथ भालके व संचालक मंडळ प्रचार दौऱ्यामध्ये आम्ही साखर कारखाना सुरू करू ऊस उत्पादकांची ऊस बिल देऊ कामगारांचे वेतन देऊ असे आश्वासन देत आहेत. परंतु त्यांच्या प्रचार सभेमध्ये ऊस उत्पादक सभासद ऊस बिल कधी देणार? कामगारांचे पगार कधी देणार? असे प्रश्न विचारू लागल्यामुळे भालके गटाची स्थिती केवल वाणी झाल्याचे दिसून येत आहे.
श्रीविठ्ठल परिवर्तन पॅनलचे अभिजीत पाटील हे ऊस उत्पादक सभासदांना उसाचे बिल दिल्याशिवाय आणि कारखान्याच्या गाळपा मध्ये मुळी टाकणार नाही. असे शपथपूर्वक सांगत आहेत. तर विरोधी गटाचे युवराज पाटील हे ऊस उत्पादकांना कारखाना चालू झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सर्व ऊस उत्पादकांची ऊस बीले कामगारांचे वेतन हे दिले जाईल. असे आपल्या प्रचार दौरे मध्ये विचार विनिमय बैठकीमध्ये ऊस उत्पादकांना सांगत आहेत.
सध्यातरी पंढरपूर तालुका व सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. दोन दादा आणि एक आबा पैकी कोण श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा घेणार ताबा?.