श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्या च्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली— अभिजित पाटील.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर(प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जशीजशी जवळ येऊ लागली आली तशी तशी सत्ताधारी गटातील नेतेमंडळी च्या पायाखालची वाळू घसरू लागली. हे चित्र आज संपूर्ण श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या विविध गावांमधून दिसून येऊ लागलेले आहेत. असे अभिजित पाटील यांनी आपल्या प्रचार दौरा मधील सभासद संपर्क अभियान मध्ये मत व्यक्त केले.
सत्ताधारी मंडळी अनेक खोटे आरोप तसेच अफवा पसरवीत शेतकरी सभासदांचे दिशाभूल करीत आहेत. या सत्ताधारी गटाच्या संचालकांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. किंवा थकित ऊस बीला बाबत तसेच कामगार वेतन बाबत मालवाहतूक दारांच्या थकीत बिलाबाबत कुठलाही तोडगा न काढता किंवा या ऊस उत्पादकांना कुठल्याही प्रकारची मदत न करता आज निवडणुकीच्या रिंगणा मध्ये ऊस उत्पादकांच्या समोर कुठल्या तोंडाने जात आहेत. त्यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची गरज होती. त्यावेळी या नेतेमंडळींना ऊस उत्पादकांनी फोन केले असता नॉटरिचेबल असे ऐकायला मिळत होते. आज हेच नेतेमंडळी स्वार्थासाठी एकमेकाच्या विरोधात उभा राहून जनतेच्या दरबारामध्ये पुन्हा एकदा खोटी आश्वासने घेऊन रिचेबल होत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी अशा भूलथापांना बळी पडणार नाही. याची जाणीव या सत्ताधारी नेते मंडळींना होऊ लागल्यामुळे वेगवेगळे कारणे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात मधून मला कसे बात करता येईल त्याच्या असंख्य प्रयत्न हे विरोधक करीत होते. परंतु माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे माझा उमेदवारी अर्ज वैध ठरला आणि विरोधकांचे कित्येकांची अर्ज अवैध ठरले हे आज दिसून आले आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांचे थकीत ऊस बील, तसेच कामगारांचे थकीत वेतन, मालवाहतूक दारांचे थकित बील कारखान्याच्या गाळपाचे मोळी टाकण्याअगोदर अस सर्व बील देऊन टाकणार आहे .मगच मी उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम करणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस बाहेर कुठे काट्यावर वजन करून आणावा त्या वजनाप्रमाणे उसाचे बिल देण्यात येणार आहे. मापात पाप करण्याची माझी वृत्ती नाही आणि भूमिकाही नाही. हे शेतकरी उत्पादकांना मी आवर्जून सांगू इच्छितो आज कोर्टी व भंडीशेगाव येथील प्रचार सभेमध्ये अभिजीत आबा पाटील यांनी मनोदय व्यक्त केला.