Uncategorized

विरोधकांना नगरपालिकेच्या प्रश्नांची जाण नाही : प्रशांतराव परिचारक

नगर पालिकेचा निधी लुटण्याचा विरोधकांचा डाव

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेत गेली 40 वर्ष आमची सत्ता असल्याने जनतेचे व नगरपालिकेचे नेमके काय प्रश्न आहेत की आम्हाला जाण आहे. परंतु विरोधकांना जाण नाही. व सर्व साधारण महिलेसाठी नगराध्यक्ष पदाची जागा असल्यामुळे आणि उमेदवारी जाहीर केली आहे. ओबीसीची जागा असती तर ते इकडे फिरकले सुद्धा नसते. नगरपालिकेचा निव्वळ येणारा निधी हडप करण्याच्या उद्देशाने ते पालिकेची निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक जवळ आली की ते सक्रिय होतात. नाही तर ते कायम नॉट रिचेबल असतात . असा आरोप भाजप व पंढरपूर व मंगळवेढा शहर सुधारणा विकास आघाडीचे नेते विधान परिषद सदस्य प्रशांत राव परिचारक यांनी केला.

ते महात्मा फुले चौक येथे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते. प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार लता संजय निंबाळकर अंबालाल( गुरु) दोडिया व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामलताई शिरसाट तसेच भारतीय जनता पक्ष व पंढरपूर मंगळवेढा शहर सुधारणा विकास आघाडीचे सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले .पुढे ते म्हणाले की आम्हाला सत्तेचा मोह नाही. आमच्या घरातील कोणीही निवडणुकीसाठी उभा केले नाही. माझे आजोबा पंढरपूर नगर परिषदेचे 17 वर्ष नगराध्यक्ष होते. माझे चुलते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक तीस वर्षे आमदार होते. अर्बन बँकेची स्थापना माझ्या आजोबांनी केली. पंढरपूर नगर परिषदेचा विकास करायचा असेल तर केंद्र व राज्य सरकारकडून निधी येणे अपेक्षित असते. यासाठी सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात नगरपालिका येणे गरजेचे आहे. 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा सादर केला होता त्यातील 90% कामे आम्ही पूर्ण केली आहेत. 22 पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या असून त्यामध्ये 30 दशलक्ष लिटर पाणी नदीतून उचलले जाते . शहरात दररोज 40 टन कचरा तयार होतो . त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. ड्रेनेज कामाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्याचे काम सुरू आहे. घरपट्टी पाणीपट्टी शॉपिंग सेंटरचे भाडे, छोटी कपाटे, रस्त्यावरील विक्रेत्याकडून येणारी भाडे नगरपालिकेच्या उत्पन्नाचे साधन आहे. या उत्पनातून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाकडून निधी मिळवावा लागतो तरच विकासाची कामे होऊ शकतात. शासन हे विरोधकांची सत्ता आल्यानंतर त्या पद्धतीने निधी देऊ शकत नाही. विरोधकांची तो निधी खेचून आणण्याची क्षमता नसते. म्हणुन नगरपालिका ही भारतीय जनता पक्ष व पंढरपूर मंगळवेढा शहर सुधारणा विकास आघाडीच्या ताब्यात द्यावी. असे आवाहन त्यांनी केले. पंढरपूर मंगळवेढा शहर सुधारणा विकास आघाडी ही आम्ही नोंदणी केलेली स्थानिक आघाडी  आहे याद्वारेच मागील सर्व निवडणूक आम्ही लढविल्या  आहेत.या आघाडीचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी आम्ही या आघाडीद्वारे काही उमेदवार उभे केले आहेत असा खुलासा यावेळी त्यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close