Uncategorized

उमा महाविद्यालयात सुरु होणार सहकार अध्यासन केंद्र :प्रणव परिचारक

राज्यात सहकार समृध्दीचा पहिलाच प्रयोग

कर्मयोगी सुधाकरपंत  परिचारक 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर: पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने येथील उमा महाविद्यालयात कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक सहकार अध्यासन केंद्र या नावाने नवे सहकार व्यासपीठ निर्माण करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त प्रणव परिचारक यांनी दिली. राज्यातील हे पहिलेच सहकार अध्यासन केंद्र आहे.

सहकारातील डॉक्टर म्हणून ख्याती असलेल्या माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी ४० वर्षाहून अधिक काळ सहकारामध्ये मोठे कार्य केले आहे. याचा संपुर्ण राज्यात आदर्श मानला जातो. यामुळेच त्यांचे नातू प्रणव परिचारक यांनी सर्वसामान्याची सहकारातून समृध्दी व्हावी, याद्वारे नवीन उद्योग निर्माण व्हावेत यासाठी सदर अध्यासन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर सहकार केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरातील सहकारी संस्थांना बळकटी देणे, सहकारामधील नवे संशोधन करणे, सहकार वृद्धीसाठी नवे प्रकल्प राबवणे, सहकारी कायदे आणि सहकारातील नवी तंत्रज्ञान नवे प्रवाह याविषयी सहकारी संस्थांमध्ये काम करणार्‍या पदाधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षित करणे, सहकाराची ओळख करून देणारा अभ्यासक्रम सर्व वयोगटातील घटकांसाठी सुरू करणे, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला सहकारी संस्था उभा करणे, केंद्र व राज्य सरकारच्या नव्या सहकारी कायदे व योजनांची माहिती जनतेला करून देणे अशा विविध अजेंड्यांवर हे केंद्र उभारले जाणार आहे.

केंद्राच्या सहकाराच्या माध्यमातून १५२ योजना असून विविध 55 प्रकारच्या सहकारी ५५ संस्था येतात. मात्र यापैकी फार थोड्या सहकारी संस्थांची माहिती ग्रामीण भागात आहे. याद्वारे ग्रामीण भागात आर्थिक समृध्दी आणणे व सहकार चळवळ वाढविणे हा उद्देश असल्याचे परिचारक यांनी सांगितले.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर केंद्र कार्यरत राहणार आहे.

या पत्रकार परिषदेस माजी प्राचार्य मिलिंद परिचारक, मुकुंद परिचारक, उमेश विरधे, रमेश लाड, राजगोपाल भट्टड, प्राचार्य बाड आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close