गौतम विद्यालयचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठया उत्सहात संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर: पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई, संचलित, गौतम विद्यालय येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठया उत्सहात पार पडला. यावेळी सौ तृप्ती राजू खरे,पी ई सोसायटी मुंबईचे कार्यकारी सदस्य, सुनिल संर्वगोड, डॉ तुषार खंडागळे कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम विदयालयाचे मुख्याध्यापक, एन. एम वाघमारे सर यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात केली.

त्रिशरण पंचशील सम्यक सर्वगोड, अस्मिता सर्वगोड, साक्षी सर्वगोड यांनी म्हटले तर. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती आराध्ये मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय नितीन कांबळे सरांनी दिला.. शाळेचा वार्षिक अहवाल वाचन डी. टी.सावंत सरांनी केले.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक, वाघमारे एन एम यांनी केले. सूत्रसंचालन कवडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती आराध्ये मॅडम यांनी केले तर आभार कसबे सर यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला, सायंकाळी ७ वा वाजता विद्यार्थ्यांच्या विविध कला दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.



