आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून जो सतत अभ्यास करतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो.” -सुनील अडगळे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
करक॔ब:-रोटरी क्लब करकंब आणि सद्भावना ग्रुप आयोजित
“युवकांसाठी प्रेरणा” शिबीरामध्ये जमलेल्या प्रचंड संख्येतील विद्यार्थ्यांना- युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना शिक्षक व साहित्यिक सुनिल अडगळे बोलत होते. यावेळी मंचावरील रोटरी क्लबचे अध्यक्ष .रघुनाथ जाधव साहेब (निवृत्त पोलिस अधिकारी), सचिव डॉ.अक्षय मोरे, संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रशांतकुमार मोरे, सद्भावना ग्रुपचे अध्यक्ष राजेश शहा,प्रा. सतिश देशमुख सर, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष धनंजयबापू इदाते,डॉ. विनोद शिंगटे,सुनील दुधाणे आदी सर्व मान्यवरांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. पुढे बोलताना ते म्हणाले की विद्यार्थी आणि युवकांनी मिळालेल्या बहुमोल वेळेचा सदुपयोग विधायक कार्य करण्यासाठी करावा. आपणास मिळालेल्या सूप्त चैतन्यदायी शक्तीच्या माध्यमातून स्वतःला घडवण्याबरोबरच समाज आणि देश घडवावा.
यावेळी कवी सतीश देशमुख यांनी आपल्या खूमासदार आणि अर्थपूर्ण कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्य घडवण्यासाठी प्रेरणा दिली तर अध्यक्ष रघुनाथ जाधव साहेब यांनी महासंगणकाचे निर्माते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या कार्याचा उलगडा करून बहुमोल विचार व्यक्त केले.यावेळी मंचावरती बाळासाहेब शिंगटे माजी शिक्षण विस्ताराधिकारी पुष्पा गुळमे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसरातील रामभाऊ जोशी हायस्कूल, न्यू. इंग्लिश स्कूल, सह्याद्री औद्योगीक प्रशिक्षण संस्था या शाळांचे विद्यार्थी,युवक आणि शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. डॉ. प्रशांतकुमार मोरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.