पंढरीत 9 डिसेंबर रोजी योगेंद्र यादव यांचे होणार व्याख्यान!
संविधान-लोकशाही-सामाजिक न्याय आणि २०२४ साठी आमची जबाबदारी अभियान अंतर्गत उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-संविधान-लोकशाही-सामाजिक न्याय आणि २०२४ साठी आमची जबाबदारी या अभियांनातंर्गत पंढरी नगरीत योगेंद्र यादव (भारत जोडो अभियान संयोजक) यांचे व्याख्यान होणार आहें.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, ज्यांना या देशाचे संविधान मान्य नव्हते तेच सत्तेत आहेत. त्यामुळेच संविधानिक मूल्ये सध्याच्या राजवटीत पायदळी तुडवली जाण्याचा अनुभव आपण बारंबार घेत आहोत. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे,लोकशाही यंत्रणांचे खच्चीकरण सुरू आहे. देशातील अल्पसंख्याक, आदिवासी, दलित व महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. एका बाजूला बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या बाटा बंद करत, लोकशाही व्यवस्थाच संपवण्याचा डाव सातत्याने सुरू आहे. देशातील बेरोजगारी व विषमता शिगेला पोहोचली आहे. शिव-फुले-शाहू आंबेडकर-सावित्रीबाई आणि अहिल्यामाई फातिमा यांचे सामाजिक न्याय, समानता आणि बंधुताचे विचार नष्ट करून संविधानाने दिलेले अधिकार छुप्या पद्धतीनेना कारण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात पुन्हा एकदा मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले जात आहे. अनेक सामाजिक विचारवंत, साहित्यिक, कलाकार, प्रामाणिक अधिकारी दडपणाखाली असल्याचे पाहवयास मिळत आहे. गेल्या ९ वर्षात सर्व स्तरावर देशाची पीछेहाट सुरु आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यासाठी भारत जोडो अभियान विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मूल्याधारित प्रजासत्ताक आणि देशाची एकता आणि बंधुता आबाधित राखण्यासाठी, राजकीय बदलापासून सामाजिक आणि आर्थिक बदलांना चालना देण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयासाठी न्याय,स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्वाचे घटनात्मक वचन सुरक्षित राखण्यासाठी मिशन २०२४ राबवत आहे.जात-धर्माच्या नावावर द्वेष पसरवून देशाची एकता आणि सामाजिक सलोखा बिघडवू पाहणा-या मनुवादी आणि विषमतेचा पुरस्कार करणा-या शक्तींना सत्तेतून पायउतार करण्याचा प्रमुख उद्देश घेऊन समाजातील सर्व घटकातील परिवर्तनशील विचाराच्या व्यक्ती संघटना संघटीत आणि जागृती करण्याचे काम केले जात आहे. या अनुषंगाने शनिवार दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता भक्ती मंगल कार्यालय, (फरताळे दिंडी) उंच विठोबा जवळ भक्ती मार्ग, पंढरपूर या ठिकाणी भारत जोडो अभियानचे संयोजक योगेंद्रजी यादव मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती पत्रकाद्वारे संयोजक ललित बाबर यांनी दिली आहें.
आपण स्वतः तसेच आपल्या पक्ष/संघटना मधील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आवाहन ललित बाबर, शोभाताई करांडे, अॅड. सविता शिंदे, हसीब नदाफ, गौतम सरतापे, बाबासाहेब बडवे, नाथन केंगार, हेमू चंदेले, सुभाष घोडके, डॉ. कुमार लोंढे, दिलीप पवार, सुखदेव गुळ्ळीग, सागर लवटे, बाळासाहेब तळे, महादेव पारसे, शर्मिला केदार, शबाना शेख, अनिल जगधने, नंदू मोरे आयोजक: भारत जोडो अभियान व अन्य समविचारी संघटना यांनी केले आहें.

ww


