Uncategorized

स्मृतीशेष तुकाराम दादा भोसले यांच्या स्मृतीदिना निमित्ताने वृक्षारोपण

सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती मध्ये सौदंर्याची भर 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

सरकोली :-दि. 4डिसेंबर 23  रोजी स्मृतीशेष तुकाराम( दादा) वसुदेव भोसले यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्ताने त्यांचे कुटुंबीयांच्या वतीने सुपारी व फुलांच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.   समाधान तुकाराम भोसले सरांनी त्यांचे आई-वडिलांचे स्मृतीप्रित्यर्थ 700 सुपारीची रोपे देण्याचा मोठा संकल्प केला आहे. त्यापैकी साधारण 150 ते 200 रोपे आत्तापर्यंत दिली आहेत.


आज श्री भैरवनाथाचे दर्शनास आलेल्या भगिनी सौ. पार्वती शिवाजी मोरे व स्नेहल विजय मोरे यांनीही वृक्षारोपण केले. दिपवाळी सुट्टी मध्ये भगिनी सौ पद्मिनी दत्तात्रय पवार अकलूज (ज्ञानोबा कराळे यांच्या कन्या),व सुप्रिया यशवंत गिड्डे सांगली,विद्या संतोष पराडे अकलूज( कराळे भगिनी)याही आल्या होत्या. त्यांनी पर्यटन स्थळास भेट दिली. तसेच  सुरेश कृष्णा भोसले यांच्या चिरंजीवाच्या विवाह साठी वऱ्हाडी महिला यांनी पर्यटन स्थळास भेट दिली. आत्तापर्यंत झालेली कामे पाहून आनंद व्यक्त केला.


आम्ही सर्व सेवेकरी रोज पर्यटन स्थळावर काही ना काही श्रमदान करीत असतोच.–विलास श्रीरंग भोसले माजी पोलीस कर्मचारी
माझ्या उत्साहाची गोष्ट अशी,पर्यटन स्थळावर मी प्रवेश करताच लहान मुले माझ्याकडे काका, काका, पोलीस काका म्हणून पळत येतात. श्रमदानाचे साहित्य घेतात, रोपे आणतात, माझ्याबरोबर थोडे थोडे काम करू लागतात. लहान मुलांचा उत्साह, आनंद ,जोश पाहून मलाही ऊर्जा ,आनंद निर्माण होतो. या मुलांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मुलं आमच्यासोबत पर्यटनांच्या कामात असतात. यातून त्यांना चांगले वळण लागते.

 

वृक्षारोपणाचे महत्त्व कळते. त्यांच्या अभ्यासा शिवाय वेळ इकडे तिकडे जातो तोच वेळ चांगल्या कामात, चांगल्या सवयी मध्ये जातो. पुढे हीच मुले मोठी होतील त्यावेळी इथले मोठे झालेले वृक्ष पाहून. पर्यटनाचा विकास पाहून .छाती ठोकपणे सांगतील मीही या पर्यटन स्थळ निर्मितीमध्ये योगदान दिले आहे.

वृक्षारोपण, श्रमदान केले आहे .लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी, झाडांचे महत्त्व कळण्यासाठी, कामाची ,बोलण्याची चांगली सवय लागण्यासाठी ,त्यांचा व्यायाम होण्यासाठी ,सुट्टी वेळी आमच्याकडे आणून सोडा. निश्चितपणे आम्ही त्यांना सहभागी करून घेऊ. चांगले संस्कार देऊ . लोकवर्गणीतून साकार होत असलेल्या सरकोली ता पंढरपूर पर्यटन स्थळावर आपल्या कुटुंबासह, मुलासह या. इथला विकसित परिसर पहा. जमले तर श्रमदान करा. स्वच्छता करा. शुद्ध हवेचा आस्वाद घ्या. मन प्रफुल्लित होइल.फोटोग्राफी करा.ग्रुपवर पाठवा. निश्चितपणे आपली ऊर्जा वाढेल आनंद मिळेल.असे आवाहन विलास श्रीरंग भोसले माजी पोलीस कर्मचारी (मो. नं 9923433535.)यांनी केले आहें.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close