Uncategorized

माढा मतदार संघात महायुतीने प्रस्थापित ऐवजी विस्थापिताला उमेदवारी द्यावी –संजय हाके पाटील

धनगर समाजाला उमेदवारी मिळावी ही मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर -obc हा बीजेपी चा डीएनए आहे असे बीजेपी नेते सांगत असतात परंतु उमेदवारी देताना मात्र obc ला विसरतात. माढा मतदार संघ हा महायुती साठी अनुकूल आहे तरीही विद्यमान आमदार बबनदादा शिंदे दुसरीकडून प्रयत्न करतात याबाबत त्यांचे वै्येक्तिक काहीतरी अडचण असू शकते. माढा मतदार संघात महायुतीने प्रस्थापित ऐवजी विस्थापिताला उमेदवारी द्यावी अशी मागणी संजय हाके पाटील यांनी व्यक्त केली.पत्रकार भवन पंढरपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माढा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे.

तसेच महा आघाडीने सोलापूर जिल्ह्यात तीन उमेदवार धनगराचे दिले आहेत. महायुतीने माढा मतदार संघात धनगर समाजाला उमेदवारी द्यावी त्यासाठी मी स्वतः व माऊली हळणकर इच्छुक आहोत. माऊली हळणकर म्हणाले कीं या बाबत आम्हीपक्षा कडे मागणी करणार असून उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष निवडणूक लढविणार आहोत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close