रिपब्लिकन सेनेच्या वतीने “दीक्षाभूमी ते चैत्यभूमीपर्यंत सविधान बचाव यात्रा”
25 नोव्हेंबर रोजी पंढरपूरात होणार आगमन... .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-चलो पंढरपूर चलो पंढरपूर चलो पंढरपूर….सरसेनानी आनंदराज आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा आंतरराष्ट्रीय स्मारक, इंदूमिल आंदोलनाचे प्रणेते, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजभूषण काकासाहेब खंबाळकर प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन सेना किरण घोंगडे प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेनायांचे नेतृत्वखाली” दीक्षाभूमी ते चैत्यभूमीपर्यंत सविधान बचाव यात्रा” आयोजित केलेली आहे. या यात्रेचे आगमन पंढरपूरत शनिवार दि.२५/११/२०२३ रोजी सकाळी ११ वा. आहे होणार आहें.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या दरम्यान रॅली निघणार आहें.. यावेळी सर्व भीमसैनिक व आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी स्वागतास उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवहान सागर गायकवाड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना यांनी केले आहें.




