प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते- ॲड. वैभव टोमके

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर:-कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याने निश्चितपणे आपल्या साध्य होऊ शकते यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवा असे मत श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. वैभव टोमके यांनी व्यक्त केले.
विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी शास्त्र शाखेत शिकणारी कु. शेजल चव्हाण ही धनुर्विद्या स्पर्धेत पुणे विभागात प्रथम आल्याबद्दल तिचा सत्कार संस्थेचे ॲड. टोमके यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
कु. सेजल चव्हाण हिने आपल्या मनोगतात सांगितले की मी गेल्या काही वर्षांपासून सातत्य पूर्व प्रयत्न करत असून माझ्या आई-वडिलांनी माझ्या या प्रयत्नासाठी फार मोठे कष्ट घेतले त्यांचेही यामध्ये फार मोठे योगदान आहे तसेच आपल्या महाविद्यालयाचेही मोठे योगदान यामध्ये आहे.
कु.चव्हाण हिच्या वडिलांनी आपल्या मनोगतात सांगितले की विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयाने आमचा केलेला सन्मान कायम स्मरणात राहील. आमची कोकणातून येथे बदली झाल्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी इयत्ता अकरावी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालय शोधत होतो परंतु सर्वांनी विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव सुचविले त्यामुळे आम्ही इथे प्रवेश घेतला खरोखरच आपले महाविद्यालय सर्व बाबतीत आदर्श आहे. यावेळी क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे व राहुल दळवी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनीआभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री राजेंद्र पाराध्ये होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंडे यू.आर. यांनी केले तर आभार पाटील पी. पी. यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.