Uncategorized

स्वेरी फार्मसीच्या ४ विद्यार्थ्यांची टी.सी.एस.सिग्मा या कंपनीत निवड

छायाचित्र- संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरी चिन्ह, फार्मसी चिन्ह व कंपनीत निवड झालेले विद्यार्थी अनुक्रमे दिव्या नवले, विश्वजीत पाटील, परवेज मुजावर व सिद्धेश्वर साखरे.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर- ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस सिग्मा तथा टी. सी. एस. सिग्मा’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मधील ४ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
फार्मसी क्षेत्राशी संबंधीत असलेल्या ‘टी. सी. एस. सिग्मा’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरीतून फार्मसी विभागातील दिव्या खंडू नवले, विश्वजीत राजकुमार पाटील, परवेज प्यारेलाल मुजावर व सिद्धेश्वर सुनील साखरे या ४ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. क्लिनिकल डेटा व्यवस्थापन, फार्माकोव्हिजिलन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, जनरल डोमेन अशा विविध विभागांसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. निवड प्रक्रियेकरीता टी.सी.एस. या कंपनी कडून अॅप्टिट्यूड, ग्रुप डिस्कशन, व एच.आर. राउंड अशा वेगवेगळ्या स्तरांवर निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध व्हावी म्हणून कॉलेजच्या वतीने टी.सी.एस. सिग्मा या कंपनीसोबत समन्वय साधण्यात आला होता व ऑनलाईन पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यामधून स्वेरी फार्मसीच्या ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये तज्ञ प्राध्यापकांकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव्ह, ग्रुप डिस्कशन, यांचा समावेश आहे. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘टी. सी. एस. सिग्मा’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या चारही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close