कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती विठ्ठल कारखाना येथे साजरी..
विठ्ठलचे विद्यमान चेअरमन,व्हा चेअरमन व संचालक मंडळाला पडला विसर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी पंढरपूर तालुक्याच्या कृषी – औद्योगिक क्रांतिचे जनक,माजी आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कर्मवीर आण्णांच्या पुतळा पुजन व जयंती कार्यक्रम संपन्न झाला. कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याच्या पुजन कामगार व अधिकारी वर्गाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते.याप्रसंगी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक व आण्णांचे नातू अमरजित पाटील हे आर्वजुन उपस्थितीत होते.परंतु कारखान्याचे विद्यमान चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळापैकी कोणी ही सदर ठिकाणी उपस्थितीत नव्हते.याबाबत चौकशी केली असता सर्वांना निरोप देण्यात आलेला होता.अशी माहिती मिळाली.परंतु,सदर कार्यक्रमास विद्यमान संचालक मंडळापैकी कोणी ही हजर राहिले नाही.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना विद्यमान संचालक मंडळाच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्यामुळे बंद पडलेला आहे.कारखाना सुरु होण्या पेक्षा विद्यमान मंडळींना राजकारण करण्यात जास्त रस असल्याचे दिसून येत आहे.यातून संचालक मंडळात सतत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.असे मत अमरजीत पाटिल यांनी व्यक्त केले.,कर्मवीर आण्णांच्या जयंती दिनाचा विद्यमान चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळाला विसर पडल्याच्या प्रकारामुळे सभासद – कामगार यांनी स्वत: जयंतीचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.विद्यमान संचालकांच्या गैरहजरी बद्दल कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.