Uncategorized

श्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत सेनेच्यावतीने रक्तदान शिबीर,वारकऱ्यांना अन्नदान व विद्यार्थ्यांना वह्या वाट

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत सेना पंढरपूर तालुकाध्यक्ष सतीश सरगर यांच्यावतीने पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ व तनाळी या दोन गावांमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या माध्यमातून सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 500 वह्या वाटप करण्यात आल्या. त्यानंतर वारकरी भाविक भक्तांना जेवण देवून अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्यावतीने करण्यात आले.
या सदर कार्यक्रमासाठी विठ्ठल ढगे, आसबे साहेब, नारायण मोटे, माऊली पळसे, सुरेश मोटे मेंबर, भाऊसाहेब पळसे, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या अन्नदान कार्यक्रमानंतर वारकरी भाविकांनी आशिर्वाद देवून त्यांचे इच्छित कार्य पुर्ण व्हावे अशा अभिजीत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close