Uncategorized

आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..

पंढरपूर येथील नवीन पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पदास मंजुरी

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

प्रतिनिधी/- पंढरपूर येथे स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयाठी अप्पर पोलीस अधीक्षक पद निर्माण करण्याची मागणी शासनाकडे आमदार अभिजीत पाटील यानी पत्राद्वारे तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात मांडली होती. पंढरपूरच्या वाढत्या गरजा शासनाच्या निदर्शनास आणून देत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता..

आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री वारीदरम्यान लाखो वारकरी येथे दाखल होतात. वर्षभर धार्मिक कार्यक्रम, व्हीआयपी दौरे, परदेशी पर्यटकांची ये-जा आणि वाढती लोकसंख्या यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठा ताण पडतो. ही गरज ओळखून राज्य सरकारने पंढरपूर येथे नवीन पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला..

या निर्णयामुळे पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला व अकलूज उपविभागातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम होईल. वरिष्ठ स्तरावर तातडीने निर्णय घेणे शक्य होऊन मोठ्या धार्मिक उत्सवांचे नियोजन अधिक शिस्तबद्ध होईल. वारकरी, भाविक, नागरिक व पर्यटक यांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास याची निश्चितच मदत होईल..

पंढरपूरच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक धन्यवाद आमदार अभिजीत पाटील यांनी मानले.

वारकरी संप्रदाय व लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा निर्णय पंढरपूरच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासाचा ठरेल असेही आमदार अभिजीत पाटील म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close