Uncategorized

अनेक संत व क्रांतिवीरांच्या योगदानामुळे भारताला गौरवशाली परंपरा लाभली -स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

छायाचित्रः भारताचा ७७ व्या स्वातंत्र्यदिन निमित्त स्वेरी मध्ये ध्वजारोहण करताना स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, इतर स्टाफ सोबत ध्वजारोहण प्रसंगीचे स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे विहंगम दृष्य.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूरः- ‘या देशामध्ये सामाजिक क्रांती १७ व्या शतकात झाली असली तरीही खऱ्या अर्थाने त्याचे बीज १३ व्या शतकात रोवले गेले. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या नंतर देखील संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांच्याकडून संपूर्ण विश्वाला बहुमोल शिकवण दिली गेली. त्यामुळे आज तुमच्यासारख्या विद्यार्थी-युवकांच्या माध्यमातून देशाची गौरवशाली परंपरा पुढे जात असताना या भूमीत अभिमानास्पद कार्ये घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरता येणार नाहीत. क्रांतिकारी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक यांच्या सारख्या अनेक थोरांनी आपल्यासाठी तुरुंगवास भोगला. त्यांच्या कार्यामुळे आपण गुलामगिरीतून मुक्त झालो. त्यांच्या त्यागातून भारतात सर्वत्र स्वातंत्र्य, समता आणि बंधुता निर्माण झाली. त्यामुळे नव्या पिढीने या सर्व स्वातंत्र्यवीरांचे भान ठेवावे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यश कुलकर्णी यांनी गिटार वाद्यासह सुमधुर चालीत ‘ये मेरे वतन के लोगो…’ हे गीत गायले. निखील देवकर व प्रताप लऊळे यांनी ‘स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगून युवकांचे कार्य कसे असावे यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणजे नेमके काय? हे सांगताना स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी स्त्री-पुरुष समानता, सामाजिक हक्क, विद्यार्थ्यांची कर्तव्ये व त्यांच्या पुढील आव्हाने यावर प्रकाश टाकला. ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’ या त्रैमासिकाचे तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांच्या विविध विभागांच्या न्यूज बुलेटीन्सचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ.शिवाजी पाटील, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेवराव कागदे, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. साक्षी शिंदे, दत्तात्रय ऐवळे व प्रा.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close