विवेक वर्धिनी चे माजी विद्यार्थी निर्मलकुमार भोसले व प्रतिक काळेल यांचा सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
:-श्रीकांत कसबे
पंढरपूर -विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे विवेक वर्धिनी चे माजी विद्यार्थी महाराष्ट्रात द्वितीय आलेले नूतन पोलीस उपनिरीक्षक निर्मल कुमार भोसले यांचा सत्कार संस्थेचे सचिव ॲड. वैभव टोमके यांच्या हस्ते संपन्न झाला
त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री भोसले आपल्या मनोगतात म्हणाले, जगात कोणत्याही माणसाला प्राप्त झालेले यश हे दुसरे तिसरे काही नसून त्यांनी केलेल्या अभ्यासाचा नैसर्गिक परिणाम असतो. अभ्यासातील सातत्य, चौकस बुद्धी, आणि आत्मविश्वास यातूनच आपणास यश प्राप्त होते. त्यांनी अनमोल त्याचबरोबर इयत्ता बारावीचा विद्यार्थी प्रतिक पोपट काळेल याने NEST या परीक्षेत यश संपादन करून भुवनेश्वर या ठिकाणी NISER या संस्थेमध्ये त्याची निवड झाली त्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव ॲड. टोमके म्हणाले की आपल्यापैकी जे विद्यार्थी आपले करिअर एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांद्वारे घडवू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना सुद्धा विवेक वर्धिनी कुठेही कमी पडणार नाही. याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थी भविष्यात कोणत्या क्षेत्रात जाऊ इच्छिता याची माहिती जाणून घेतली.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री यु आर मुंढे सर यांनी आपल्या अभिभाषणात विद्यार्थ्यांसाठी माझे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सर्व शिक्षक अहोरात्र कष्ट करत असल्याने आमचे विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात नेत्र दीपक कामगिरी करत आहेत याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रा. तुकाराम मस्के यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चव्हाण व आभार चलवाड व्ही.एस यांनी मानले
कार्यक्रमास किमान कौशल्य विभाग प्रमुख संजय पवार , वसतिगृह अधीक्षक अमोल हुंगे, पोपट काळेल, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.