Uncategorized
स्वातंत्र्यदिनानिमित्त संचालक श्री धनंजय काळे यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल कारखान्यावर ध्वजारोहण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर, दि. १५ स्वतंत्र भारताच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री विठ्ठल सह. साखर कारखान्यावर कारखान्याचे संचालक श्री धनंजय उत्तम काळे यांच्या शुभहस्ते व व्हाईस चेअरमन सो. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, सुरेश भुसे, नवनाथ नाईकनवरे, जनक भोसले, सिताराम गवळी, अशोक घाडगे, प्र. कार्यकारी संचालक, श्री डी.आर. गायकवाड, श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य व त्यांचा सर्व स्टाफ तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व परिसरातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.