Uncategorized

पंढरीत स्मृतिशेष प्रा..हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण !!!

आम्ही भारतीय लोक, व विविध संघटनेचा सहभाग

आम्ही भारतीय लोक, व विविध संघटनेचा सहभाग

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:- पुरोगामी विचारवंत, फुले, शाहू , आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक स्मृतीशेष प्रा. हरी नरके यांचे काल निधन झाले.त्यांचे निधनाने समाजाची मोठया प्रमाणात हानी झाली असून त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात मान्यवरांनी श्रद्धाजली सभेत भावना व्यक्त केल्या.

डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आ ज प्रा. हरी नरके याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आम्ही भारतीय लोक, व विविध संघटनेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिलीप पवार (माजी तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ )हे होते.सुरुवातीस स्मृतिशेष प्रा. हरी नरके यांचे प्रतिमेस पुष्वहार अर्पण करण्यात आला. संभाजी  ब्रिगेडचे प्रवक्ते अमरजीत पाटील,जेष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजीराव वाघमारे, जेष्ठ साहित्यक प्रा.भास्कर बंगाळे,  जैनुद्दीन मुलाणी संपादक  राष्ट्र युवा राष्ट्रचेतना’ दिलीप भोसले,बिराप्पा मोटे सर (जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी )किरणराज घाडगे ( संभाजी ब्रिगेड प.महाराष्ट्र )मोहन अनपट ( श्रमिक मुक्ती दल ) जेष्ठ नेते एल.एस सोनकांबळे (बसपा ) यांनी नरके सरांच्या साहित्य चळवळीचा आढावा घेतला.

यावेळी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर,राजु शिंदे ( शहराध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी)  पंकज  देवकते (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पार्टी )गौतम सरतापे, पुरुषोत्तम देशमुख,घनशाम शिंदे,नागेश झेंडे,, गुरु दोडीया,हनुमंत बंगाळे
सागर शेजाळ, आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील वाघमारे (प्रबुद्ध परिवार )यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीकांत कसबे ( संपादक जोशाबा टाईम्स )यांनी केले.
शेवटी काही क्षण स्तब्द उभा राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close