Uncategorized

मंडलाधिकारी  राजेश  विटेकर यांचा “साहित्यरत्न गुणगौरव पुरस्कार”:देऊन सन्मान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर (प्रतिनिधी) :दक्षिण  सोलापूर तालुक्यातील महसूल  कर्मचारी  मंडलाधिकारी  राजेश  विटेकर यांचा “साहित्यरत्न गुणगौरव पुरस्कार”: प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. अजनसोंड, ता. पंढरपूर येथे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी वस्ताद ग्रुप (एल.व्ही. ग्रुप) यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.

शिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे,यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दलितमित्र नानासाहेब वाघमारे, तर प्रमुख पाहुणे श्रीकांत कसबे, संपादक जोशाबा टाईम्स,भगवान वानखेडे, संपादक पंढरपूर लाईव्ह,अभिराज  उबाळे लोकशाही  चॅनल  प्रतिनिधी,प्राचार्य भाऊसाहेब  कांबळे,धनाजी वाघमारे, रामभाऊ सुरवसे, गुरु दोडीया,ऍड.किशोर खिलारे, राजाभाऊ मिसाळ पत्रकार , सुनील अडगळे गुरुजी, दादासाहेब भुसे आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता कांबळे सर यांनी केले, प्रास्ताविक लक्ष्मण बंगाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन  संयोजक समाधान वायदंडे यांनी केले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close