
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल-(JSB न्यूज पोर्टल )
श्रीकांत कसबे
सोलापूर:- बँक ऑफ महाराष्ट्र मधील सफाई कामगारांना वीस वर्षे सेवा करूनही तोंडी आदेश देऊन निलंबित केले प्रकरणी व काही हंगामी कामगारांना गुलामासारखी वागणूक देऊन सकाळी आठ ते रात्री आठ वेठ बिगारासारखे काम लावत असल्यामुळे, आणि कमी केलेल्या कामगारांच्या ठिकाणी स्वतःच्या नातेवाईकांची काही बँक अधिकाऱ्यांनी भरती करून भ्रष्टाचार केल्यामुळे व पाठीमागून भरती करून सदर कामगारांना कायमसवेत घेतल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करून त्यांची खाते निहाय चौकशी व इतर मागण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूरच्या पूनम गेटवर बेमुदत धरणे आंदोलन चालू असून पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी सहाव्या दिवशी भेट दिली असता बँकेचा एकही अधिकारी तिकडे फिरकला नसल्यामुळे प्रा. वायदंडे भडकले आणि आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता वाढवण्याचे आदेश दिले जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवा वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्याचे आदेश ही यावेळी प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिले असून ते आंदोलक व कार्यकर्त्यांना घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता जिल्हाधिकाऱ्यांनी थेट लेखी पत्र काढून बँक कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागविला असून पुरोगामी संघर्ष परिषदेचे आंदोलन निर्णायक वळणावर येणार असल्याचे समजते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा सुनीता खटावकर,राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष नेताजीराव अवघडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कृष्णाजी गायकवाड,पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण अध्यक्ष भीमराव गडहिरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख पांडुरंगग ऐवळे, पश्चिम महाराष्ट्र वरिष्ठ वरिष्ठ अविनाश कांबळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब फाळके, वरिष्ठ जिल्हाध्यक्षा ज्योतीताई अवघडे, ग्रामीण जिल्हाध्यक्षा रेशमा कांबळे, रेणुका बनसोडे,हरी बोराडे, बंडू तोरणे, संभाजी भडकवाड, अशोक हत्तेकर, संजय केंगार, विठ्ठल नाटिकर, कौशल्या बोराडे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



