शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 6जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात आयोजन
लोकोत्सव, धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, "जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा," व 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा 'ठरणार मुख्य आकर्षण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांचे वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 6जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समिती सदस्य प्रा. महादेव तळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माहिती देताना पुढे ते म्हणाले की, लोकोत्सव, धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, “जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा,” व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा ‘
मुख्य आकर्षण ठरणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राची युद्ध कला कशी असते याचे दर्शन गडावर येणाऱ्या तमाम देशवाशीयांना व्हावे या हेतूने ” धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची ” हा शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षीकाचा कार्यक्रम होणार असून .पट्टा, तलवार, भाला, वीटा, जम्बिया, कट्यार, मांडू, फरी गलका, यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
सायंकाळी सात वाजता राजदरबार येथे “जागर शिवशाहीरांचा. स्वराज्यांच्या इतिहासाची “हा शाहिरी कार्यक्रम होणार असून महाहाराष्ट्रातील शाहीर भाग घेणार आहेत.
त्याच बरोबर 6 जूनला मेघडंबऱीतील छत्रपती शिवरायांच्यापुतळ्याला सुवर्णं नाण्यांचा अभिषेक होणार आहे. त्यानंतर “सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा ” या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आठरा आलुतेदार सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपल्या पारंपरिक लोक कलांचा मिरवणुकीत जागर होणार आहे. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असून या मार्गांवरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेषभुषेत सहभागी असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत प्रशांत मलपे, ऍड. ज्ञानेश्वर मोरे उपस्थित होते.