विवेक वर्धिनी विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.31टक्के

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालयाचा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ पुणे च्या परीक्षेचा निकाल 95.31टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक कु. समृध्दी सलगरकर 93.40%,व्दितीय कु. साक्षी चव्हाण 92%, गौरव काळे 92%, तृतीय कु. वैभवीपालसांडे 90.40% यांनी यश संपादन केले आहे. परीक्षेत बसलेल्या एकूण 256 विद्यार्थ्यापैकी48 विद्यार्थ्यांना विशेष योग्यता मिळाली आहे.89 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत .
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ, सचिव ॲड.वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर,ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे,मुकुंद देवधर, दिलीपआप्पा घाडगे, अनिरुद्धसालविठ्ठल , प्र.मुख्याध्यापक उत्तरेश्वर मुंढे, पर्यवेक्षक सुनील पाटील, मुख्य लिपिक हनुमंत मोरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.