Uncategorized

१० जुन २०२३ रोजी महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारीचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-महाराष्ट्राची दक्षिण काशी समजली जाणा-या पंढरपूर येथे प्रती वर्षी आषाढी वारी निमीत्ताने लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात मागील वर्षीपासून पंढरपूर सायकलर्स क्लब पंढरपूरचे अध्यक्ष  उमेशजी परिचारक यांच्या संकल्पनेतून” पायी वारी “या धर्तीवर सायकल वारी हा उपक्रम राबवित आहोत. सदर उपक्रमाचा उददेश हा तरूण पिढीस सायकल चालवणेस प्रवृत्त करणे हा आहे. मागील काही वर्षापासून नाशिक सायकलिस्ट फौडेशन बारामती सायकल क्लब यांनी पंढरपूर सायकलर्स क्लब व असंख्य वेगवेगळया गांवचे सायकल क्लब यांचे मदतीने सर्वांनी एकाच वेळेस पंढरपूर मध्ये दाखल होवून एकत्र पढरपूर नगर सायकल प्रदक्षिणा व मोकळया पटांगणामध्ये “विठ्ठल नामघोष” करीत सायकल रिंगण प्रथा करण्याचे उद्देशाने मागील वर्षी म्हणजेच सन २०२२ मध्ये महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संम्मेलन आयोजीत केलेले होते. याकरीता महाराष्ट्रभरातून ३६ ठिकाणचे सायकलप्रेमीनी पंढरपूरमध्ये एकत्रित 300 लोकांचा मुक्काम व स्थनिक २०० असे सुमारे १५०० सायकलप्रेमीनी हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. याकामी पंढरपूर सायकलर्स क्लबचे विशेष सहकार्य लाभले होते.

यावर्षी २०२३ मध्ये नाशिक सायकलिस्ट फौडेशन तसेच पंढरपूर सायकलर्स क्लब व अन्य यांचे सुचनेनुसार दरवर्षी एका सायकल क्लबला यजमान पद देण्याचे मागील संम्मेलनात ठरले नुसार  यावर्षी २०२३ करीता बारामती सायकल क्लब बारामती यांची यजमान व संम्मेलन कार्यकारणीचे अध्यक्ष क्लब म्हणून निवड केलेली आहे.

बारामती सायकल क्लब यांनी सन २०२३ चे महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी सम्मेलन याची जबाबदारी स्विकारलेली असून त्यांनी अखिल महाराष्ट्रातील सायकल क्लब यांना सदर सायकलवारी व सम्मेलनास उपस्थित राहणेसाठी आमंत्रण दिलेवरून महाराष्ट्रभरातुन अद्यापपर्यंत ३९ सायकल क्लब यांनी प्रतिसाद दिलेला असून ते सर्व सायकलप्रेमीनसाठी दि. १० जुन २०२३ रोजी सायं. ७.00 वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी येत असून त्यांची श्री विठठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास (नवीन) व वेदांत भवन या ठिकाणी निवास व जेवणाची सोय केलेली आहे. तसेच भक्तीरस भजनांचा कार्यक्रम आयोजीत केलेला असून व्याकामी पुणे येथून विशेष गायक व साधन सामुग्री मागविण्यात आलेली आहे. दि. ११ जुन २०२३ रोजी पाहाटे ६.३० ते ७.३० पंढरपूर नगर सायकल प्रदक्षिणा तसेच ७.३०  ते ८.३० रेल्वे ग्राऊंड पंढरपूर येथे “विठ्ठल नाम गजर” केला जाणार असून तदनंतर सकाळी ९.३० ते १२.०० या दरम्यान अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी सम्मेलन २०२३ हे पदमनाथ मंगल कार्यालय पंढरपूर येथे आयोजीत केलेले आहे. या सायकलवारी नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण व संम्मेलन यांचे यावर्षीचे उद्दीष्ट पर्यावरण संतुलन,वृक्षारोपण,शारिरिक समृध्दी तसेच प्रत्येक शहरास सायकलिंगचे शहर म्हणून ओळख व्हावी या उद्देशाने भाग महाराष्ट्रभरातून अंदाजे २००० सायकलप्रेमी पंढरपूर नगरी मध्ये येत आहेत. तसेच या सर्व सायकलप्रेमींना अल्पोपहार व भोजन व्यवस्था हे बारामती सायकल क्लब यांचे मार्फत केलेली आहे. या व्यवस्थे कामी युटोपीयन शुगरचे  चेअरमन उमेश परिचारक पंढरपुर तसेच पंढरपूर सायकल्स क्लब आणी बारामती सायकल क्लब यानी विशेष परिश्रम घेतले असून त्यांना नाशिक सायकलिस्ट फौडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या सायकल वारी मध्ये पंढरपूर भुईज,बालाघाट, बुलडाणा,दौडाई, गंगाखेड,इंचलकरंजी, कोल्हापूर,कुर्डूवाडी, कोरेगाव, कुपवाड,लातूर,मालेगाव, माढा,नाशिक,परभणी, फलटण, पलुस, सोलापूर,संभाजी नगर,सांगली,श्रीपुर उंबरज, मोरगाव,बारामती,व इतर अशा असंख्य शहरांमधुन सायकलप्रेमी हजर राहणार आहेत वे व्यांच्या शहरा पासून पंढरपुर पर्यव सायकलवारी करीत येणार आहेत. यामध्ये साधारण पणे ५0 की. मी ते ५00 की.मी. अंतरावरून सायकल वारी करीत येणार आहेत.याकामी स्थानिक लोकांनी त्यांना सहकार्य करावे व सहभागी व्हावे असे यजमान बारामती सायकल क्लब बारामती यांच्या तर्फे  आवाहन  करण्यात आले. या पत्रकार परिषदेत
महेश भोसले, प्रकाश शेटे , सूरज अष्टीकर, श्रीकांत बड़वे अभिजीत कुलकर्णी आदी  उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close