Uncategorized

व्यक्तीमत्व विकासासाठी अहंकारास दूर ठेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

स्वेरीत ‘विद्यार्थी आणि व्यक्तीमत्व विकास’ या विषयावर व्याख्यान संपन्न

छायाचित्र- स्वेरीत ‘विद्यार्थी आणि व्यक्तीमत्व विकास’ कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सोबत डावीकडून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी पी रोंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अधिकारी दिलीप स्वामी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मोहोळचे गटविकास अधिकारी मिरगणे, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, आदी.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक-श्रीकांत कसबे

सोलापूर – ‘व्यक्तीमत्व विकासासाठी अहंकारास दूर ठेवा. मन, विचार शक्ती, कल्पना शक्ती व अंहकार या बाबींवर लक्ष द्या.’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
पंढरपूर तालुक्यांतील गोपाळपूर येथील विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीट्यूटच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त ‘विद्यार्थी आणि व्यक्तीमत्व विकास’ या विषयावर सिईओ दिलीप स्वामी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी पी रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मोहोळचे गटविकास अधिकारी मिरगणे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, सचिव नारायण ढवळे, प्रमुख उपस्थित होते. मन प्रसन्न ठेवा. स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हा. आत्नविश्वास ठेवा. आत्मविश्वास नसेल तर केलेले सर्व प्रयत्न निरर्थक आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. सकारात्मकता वाढवा. वेळेचे नियोजन करा. सुक्ष्म नियोजन करा. वेळ तुम्हाला व आपणास निसर्गाने समान वेळ दिली आहे.खरी स्पर्धा शेवटचे दहा मार्कात आहे. अभ्यासाचे नियोजन करा. सकारात्मकता नसेल तर केलेली मेहनत वाया जाणार आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य बी पी रोंगे यांनी केले. संस्थेने विद्यार्थ्याचा व्सक्तीमत्व विकास वाढावा. स्पर्धाक्षम असलेल्या जगात विद्यार्थी टिकावा. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शन व्हावे. चांगले विचार व्यक्तीमत्व घडवितात असेही प्राचार्य डॉ.रोंगे यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना दादासाहेब रोंगे म्हणाले, मन, मनगट व मेंदु यांचा विकास म्हणजे व्यक्तीमत्व विकास आहे. असेही दादासाहेब रोंगे यांनी सांगितले. सुत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.
चौकटीत घ्या -आरोग्य जपा – सिईओ स्वामी ……………..
१४ वर्षांची मुले हृदयविकाराने मरत आहेत. आरोग्य ही संपत्ती आहे. परिक्षेत आपण आजारी का पडतो. आरोग्याच्या
बाबत सजग रहा. सकाळी लवकर उठा. खाणेची पध्दतीत बदल होत आहेत. आहाराची काळजी घ्या . ज्या पध्दतीने तुम्हाला मन मोकळे करता येते तेव्हा करा. बुध्दीची गृहणक्षमता वाढवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
चौकटीत घ्या – वक्त उनकी कदर नही करता..!
आत्मविश्वास हा आत्मविश्वास असला पाहिजे परंतू फाजील आत्मविश्वास नसला पाहिजे. जो वक्त कि कदर नही करता..वक्त उनकी कदर नही करता. हे लक्षात ठेवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
छायाचित्र- स्वेरीत ‘विद्यार्थी आणि व्यक्तीमत्व विकास’ कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सोबत डावीकडून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी पी रोंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अधिकारी दिलीप स्वामी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मोहोळचे गटविकास अधिकारी मिरगणे, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, आदी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close