Uncategorized

ग्रामपंचायत जागेतील अतिक्रमण प्रकरणी सरपंच,उपसरपंचा सह दोन सदस्य अपात्र.

उंबरे पागे ग्रामपंचायतमधील प्रकार : जिल्हाधिकाऱयांचा निर्णय.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

करकंब(प्रतिनिधी) :-
उंबरे (पागे) ता पंढरपूर येथील सरपंच -कांताबाई शिंदे,उपसरपंच- नागन्नाथ कानगुडे व सदस्या माधवी हुबाले,ब्रम्हदेव कानगुडे यांनी ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण केल्या प्रकरणी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सरपंच कांताबाई शिंदे,उपसरपंच नागन्नाथ कानगुडे आणि सदस्य माधवी हुबाले,ब्रम्हदेव कानगुडे यांना अपात्र केले असल्याचा आदेश जारी केला आहे.यामुळे करकंब सह परिसरातखळबळ उडाली आहे.
उंबरे येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2021 रोजी पार पडली आहे. उंबरे ग्रामपंचायती च्या 11 सदस्य असलेल्या या उंबरे ग्रामपंचायती च्या सरपंच पदी- कांताबाई महादेव शिंदे या विराजमान झाल्या. तर उपसरपंच पदी -नागन्नाथ कानगुडे विराजमान झाले. व सदस्या- माधवी हुबाले,ब्रम्हदेव कानगुडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.परंतु कांताबाई शिंदे,नागन्नाथ कानगुडे यांनी व माधवी हुबाले,ब्रम्हदेव कानगुडे यांनी ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण केले असल्याची जिल्हाधिकारी यांच्याकड,माणिक कसबे,धनाजी शिवपालक यांनी तक्रार करून सरपंच,उपसरपंच यांच्यासह दोन सदस्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंढरपूर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान गटविकास अधिकारी यांनी उंबरे येथे जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून माहिती घेतली असता कांताबाई शिंदे यांच्या नावे गावठाण हद्दीत असलेल्या जागेत आरसीसी बांधकाम असून त्याचा वापर खत व्यवसायाच्या गोडावून साठी वापर करीत असून मागील ग्रामपंचायत बॉडीने ठराव करून शिंदे यांना दिली असल्याची बाब समोर आली.तसेच उपसरपंच नागन्नाथ कानगुडे व ब्रम्हदेव कानगुडे यांनी येथील गायरान व गावठाण जमिनिवर तर माधवी हुबाले यांचे सासरे यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीची गट क्रमांक 345 स्मशानभूमीसाठी संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण केले असल्याचा प्रकार समोर आला. गटविकास अधिकारी यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला.
जिल्हाधिकारी यांनी सदर अहवालाचा विचार करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 पोटकलम (1)ज-3 मधील तरतुदीचा सरपंच कांताबाई शिंदे,उपसरपंच नागन्नाथ कानगुडे आणि सदस्य माधवी हुबाले,ब्रम्हदेव कानगुडे यांनी भंग केले असल्याचे ग्रहाय्य धरून उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सरपंच कांताबाई शिंदे,उपसरपंच नागन्नाथ कानगुडे आणि सदस्य माधवी हुबाले,ब्रम्हदेव कानगुडे यांना अपात्र ठरविले

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close