Uncategorized

संतोषभाऊ नेहतराव मित्र परिवाराचे वतीने नवरात्र महोत्सवा निमित्त नऊ दिवस भरगच्च विविध कार्यक्रमाचे आयोजन

नवरात्र महोत्सवानिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील तरूण मंडळ व संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळ यांच्यावतीने श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर-नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर येथील क्रांतीसिंह नाना पाटील तरूण मंडळ व संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळ यांच्यावतीने यंदाच्या वर्षी भव्यदिव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. नेहतराव परिवाराच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे यंदा 48 वे वर्ष असून प्रत्येक वर्षी काही तरी नाविण्यपूर्ण देखावे साकारण्यात येत असतात. यापूर्वी साई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, केदारनाथ मंदिर, बद्रीनाथ मंदिर, उज्जैन मंदिर, जयपूर पॅलेस, गणपती पुळे, अमरनाथ असे अनेक प्रतिकृती उभ्या करून पंढरपूर मधील नागरिकानंा एक पर्वणीच असते. अगदी त्याचप्रमाणे याही वर्षी भव्य असे 60 बाय 90 यामध्ये श्रीराम मंदिर कोल्हापूरचे कलाकार बाळासाहेब कांबळे यांनी 50 कारागीर  द्वारे उभे करण्यात आले असल्याची माहिती संतोषभाऊ नेहतराव यांनी दिली.


या नवरात्र उत्सवामध्ये दि.22 सप्टेंबर रोजी पंढरपूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीमध्ये कोळीगीत दांडिया लेझीम ढोल पथक असे विविध सांस्कृतिक खेळाचे प्रकार सादर करण्यात येणार आहेत. दि.24 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून दि.25 सप्टेंबर रोजी गंध मराठी मातीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून दि.26 सप्टेंबर महाआरती व राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 27 सप्टेंबर रोजी सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे प्रस्तृत शिंदेशाही कार्यक्रम तर दि.28 सप्टेंबर रोजी डान्स स्पर्धा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सामाजिक गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. दि.30 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर, होम मिनिस्टर स्पर्धा तर दि.1 ऑक्टोंबर रोजी दांडिया व 2ऑक्टोंबर विजयादशमी असे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम हे सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहेत


या महोत्सवामध्ये दररोज फराळाचे वाटप करण्यात येते.
सध्या देशात सर्वत्र आयोध्या येथील भव्यदिव्य अशा श्रीराम मंदिराची चर्चा होत असून अनेक भाविकांनी प्रत्यक्षात आयोध्या येथे जावून श्रीरामाचे दर्शन घेतलेले आहे. मात्र इच्छा असून ही काही नागरिकांना अद्याप ही आयोध्याला जाता आलेले नाही त्यामुळे त्या नागरिकांची इच्छा अगदी आपल्या पंढरपुरात पुर्ण व्हावी या हेतूने श्रीराम मंदिराची भव्यदिव्य अशी प्रतिकृतीच पंढरपुरात संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळाने उभी केलेली आहे.
विशेष म्हणजे संतोषभाऊ नेहतराव हे पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व असून त्यांनी त्यांचेसह त्यांचे बंधू सुरेश नेहतराव, बाळासाहेब नेहतराव या तिन्ही बंधूंनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक पद भुषविलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री सौ.सुमनताई नेहतराव यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भुषविलेले आहे. नेहतराव परिवार हा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना मानणारा असून त्यांच्या माध्यमातून संतोषभाऊ नेहतराव यांना थेट दिल्ली येथील केंद्रीय कमिटीचे उपाध्यक्ष पद मिळाले होते त्यामुळे राजकारण करीत असतानाच सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम नेहतराव परिवाराने आजपर्यंत केलेले आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत संतोषभाऊ नेहतराव यांनी लक्ष्यवेधी मताधिक्य मिळवले होते त्यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर शहरात कार्यरत आहे. संतोषभाऊ नेहतराव हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. यंदा त्यांनी नवरात्र महोत्सवानिमित्त श्रीराम मंदिराची उभारलेली प्रतिकृती सध्या लक्ष्यवेधी ठरत आहे.
सदरचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश नेहतराव, बाळासाहेब नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. संजय माने, देविदास कांबळे, अमरसिंह चव्हाण, अध्यक्ष निखिल नेहतराव, उपाध्यक्ष अमोल परबतराव, सचिव श्रीकांत शिंदे, रत्नाकर पिसे, अनिल लोकरे, समाधान लोखंडे, पंकज पवार, किरण माने,महादेव बोरकर,अमर लोखंडे, समाधान पाटोळे, अजय मगर, श्रीयेश अभंगराव, सागर लोखंडे, सागर लोंढे, अक्षय पोतदार, ऋषिकेश रायबन माऊली कुंभार आदी परिश्रम घेत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close