भारतीय संविधान बदलण्याची कोणी हिंमत करू नये….. –आ. गोपीचंद पडळकर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
सांगली प्रतिनिधि डाँ.रामदास नाईकनवरे
आटपाडी – दि. 20/11/2022
भारतीय संविधानानेच देशामध्ये लोकशाही मूल्यांची रूजवणूक करून हजारो वर्षे प्रस्थापितांच्या गुलामीत असणा-या आपल्या देशाला स्वाभिमानी बनविले. त्यामुळे भारत देश एकसंघ राहण्यास मदत झाली. म्हणून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला देशातील कोणताही राजकीय पक्ष बदलू शकत नाही. असे अवाहन विधान परिषदेचे आमदार मा.गोपिचंद पडळकर यांनी आटपाडी येथे आयोजित केलेल्या फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच. आयोजित भारतीय संवधिान जनजागृती सप्ताह व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख हे होते. विदयार्थी , विदयार्थ्यींनी व खुल्या गटामध्ये संविधानाला केंद्रवर्ती मानून संविधानावर आधारीत स्पर्धा घेण्यात याव्या. त्यामुळे भारतीय संविधानाबद्दल जनजागृत्ती घडून येण्यास मदत होईल. आणि या कार्यक्रमासही यापुढील काळात योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मॉरीशस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यीक व विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश कुंभार यांनी ओ.बी.सी आरक्षण आणि भारतीय संविधान या विषयावर आपले मार्गदर्शन केले. एका रात्रीमध्ये सरकार बदलता येते पण राज्यघटना बदलता येत नाही. सर्वंच राजकीय पक्षांकडून ओ.बी.सी आरक्षणाचे राजकारण चालु आहे. पण ते पुर्ण क्षमतेने देण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून होत नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी भवानी एज्युकेशनचे चेअरमन मा.रावसाहेब काका पाटील , युवा नेते. मा.अनिल पाटीलशेठ , माजी पोलिस अधिकारी मुंबई तथा रिपाईचे सांगली जिल्हा संघटक मा. नवनीतजी लोंढे साहेब, जेष्ठ साहित्यीक साहेबराव चवरे , जेष्ठ विचारवंत मा.नंदकुमार केंगार , मा.लक्ष्मण मोटे साहेब इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये आंबेवाडीचे सुपूत्र सेवा निवृत्त शांतीदुत सुभेदार मेजर मा.महादेव नामदेव शेजाळ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन तर , कौठूळीचे सुपुत्र सेंट्रल रेल्वे बँकेचे चीफ मॅनेजर मा.डी.एस.सावंतसर यांना समाज भूषण या पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानित करणेत आले.
या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षीय भाषण फुले, शाहु, आंबेडकर , विचारमंचाचे अध्यक्ष व रिपाई (आ) चे सांगली जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्र खरात यांनी केले. प्रास्ताविक प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांनी केले असून सुत्रसंचालन विजय पवारसर तर आभार अर्चना काटे यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्यावेळी ॲङ तुषार लोंढे , धनंजय वाघमारे , हणमंत खिलारी , सुरेश मोटेसर , रणजीत ऐवळे ,समाधान ऐवळेसर , विवेक सावंत , शरद वाघमारे , राजेश मोटे , विशाल काटे , समाधान खरात , स.नि.पाटीलसर, सुनिल भिंगेसर, मारूती ढोबळे , भिकाजी खरात , नामदेव खरात , विलास धांडोरे व सुष्मिता मोटे यांच्यासह असंख्य महिलावर्ग उपस्थित होता.