आरोग्य सेविका सौ. सुप्रिया जगताप यांना वीरांगणा सावित्रीबाई फुले नॅशनल अवॉर्डने सन्मानित

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल-
–श्रीकांत कसबे
सौ. सुप्रिया जगताप यांची सेवेची सुरुवात 1990 सली प्राथमिक आरोग्य केंद्र पुरंदावडे येथील उपकेंद्र भांबुर्डी येथे झाली तेथे त्यांनी सलग 23 वर्षे आरोग्य सेवा केली त्यां एकूण 33 वर्ष आरोग्य सेवेचे काम अविरतपणे करत आहेत. त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे तसेच त्या नवनिर्मित नर्सेस संघटना पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा, सोलापूर जिल्हा नवनिर्मित नर्सेस संघटना सरचिटणीस या पदावर सध्या त्या कार्यरत आहेत जिल्ह्यातील तमाम नर्सेस भगिनींना सेवाविषयक अडचणी संदर्भात प्रामाणिक मदत करतात काळात त्यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित केले आहे या सर्व कामाचे अवलोकन होऊन त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र सदन दिल्ली येथे विरांगणा सावित्रीबाई फुले या पुरस्काराने मा.बबनराव घोलप, मा.सुरेखा ताई लंबतुरे, मा.माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.