Uncategorized

नवीन विद्युत वाहीनीसाठी 1 कोटी 31 लाख मंजूर -आ समाधान आवताडे

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी:-मंगळवेढा तालुक्यातील 132 केव्ही मंगळवेढा ते हुन्नूर 33 केव्ही विद्युत वाहिनी अतिभारित होत असल्यामुळे भाळवणी ते हुन्नूर या 33 केव्ही नवीन विद्युत वाहिनीस मंजुरी मिळाली असून त्यासाठी 1 कोटी 31 लाख रुपये निधीची तरतूद झाली आहे. या 11 किमी होणाऱ्या नवीन विद्युत वाहीनीमुळे हून्नूर, खुपसंगी, नंदेश्वर उपकेंद्रातील 15 गावांमध्ये सुरळीत व अखंडित वीज पुरवठा होण्यास मदत होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

मंगळवेढा येथील 132 केव्ही केंद्रातून हुन्नूर येथील उपकेंद्रात 33 केवी विद्युत वाहिनीचे काम गेल्या अनेक वर्षांपूर्वी करण्यात आलेले आहे. सध्या ही वाहिनी ओव्हरलोड झाली असून नंदेश्वर, खूपसंगी, हुन्नूर या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांना अपुऱ्या दाबाने व खंडित वीज पुरवठा होत असल्याने या भागातील शेतकरी त्रस्त आहेत. याबाबत येथील शेतकऱ्यांनी आ समाधान आवताडे यांच्याकडे तक्रार करत नवीन वाहिनी टाकण्याची मागणी केली होती. या भागात अनेक वेळा सिंगल फेज वाहिनी वरून या गावांना वीजपुरवठा होत होता.

त्यामुळे या भागतील शेतकऱ्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी 132 केव्ही भाळवणी केंद्रातून विद्युत वाहिनी टाकण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिनांक 16 जानेवारी 23 रोजी केली होती. त्यानुसार पालकमंत्री विखे पाटल यांनी तातडीने या वाहिनी चे काम होण्यासाठी डीपीडीसीतून एक कोटी एकतीस लाखाचा निधी मंजूर केला आहे. भाळवणी ते हुन्नूर ही 33 केव्ही ची लाईन 11 किमी इतकी आहे. या नवीन वाहिनी मुळे खुपसंगी,नंदेश्वर, हुन्नूर या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या नंदेश्वर, खडकी, हून्नूर, मानेवाडी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, भोसे, ममदाबाद हु, लोणार, खुपसंगी जुनोनी, पाठकळ, शिरशी, गोनेवाडी, लेंडवे चिंचाळे, कचरेवाडी गावांना अखंडित व नियमित वीज पुरवठा होणार असून लोडशेडींग ट्रीपिंगचा विषय शेतकऱ्यांना भेडसावणार नाही. तसेच आंधलगाव उपकेद्राचा लोड देखील कमी होणार आहे महावितरण च्या कामासाठी कधी नव्हे एवढा निधी गेल्या काही दिवसापासून सुमारे 10 कोटीचा निधी मिळाला असल्याने मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील अतिरिक्त डीपी, नवीन डिपी शेती पंपाची वीजजोडणी दुरुस्तीची कामे मार्गी लागू लागल्याने या कामाबाबत आ समाधान अवताडे यांच्या कामाबाबत शेतकरी वर्गातून व सर्वसामान्यातून समाधान व्यक्त होत आहे.

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासाठी महावितरणच्या कामासाठी सुमारे दहा कोटीचा निधी मिळाला असून या निधीतून नवीन डीपी अतिरिक्त डीपी मेंटेनन्स नवीन वीज जोडणी ही कामे होणार आहेत सदर कामासाठी शेतकऱ्यांनी कोणालाही एक रुपया ही देऊ नये तशी कोणी मागणी केल्यास आपल्याशी संपर्क साधावा व सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण दर्जेदार करून घ्यावीत असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close