उमेश सासवडकर यांचा विवेक वर्धिनी येथे सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-विवेक वर्धिनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व
युवराज नागरी सहकारी पतसंस्था पंढरपूरच्या चेअरमन पदी उमेश सासवडकर यांची पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल विवेक वर्धिनी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सासवडकर यांनी प्रशालेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश देणार असल्याचे सांगितले .तसेच प्रशालेसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.या सत्काराच्या वेळी मुख्य लिपिक हनुमंत मोरे, प्रशालेतील शिक्षक
राजुभाई मुलाणी, शिवाजी येडवे,सुनील विश्वासे , राजन शिंदे,महादेव रणदिवे, सिताराम मासाळ,अनिल भरले,देविदास चेळेकर,सतीश भंडारे, पोपट काळेल व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.