सामाजिक चळवळींना महिलाप्रधान बनविणे ही काळाची गरज:-जिल्हाध्यक्षा सौ.साबेरा इंगळे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिरोळ तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी श्रीमती सुनिता तिवडे यांना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन सत्कार करताना कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सौ. साबेरा इंगळे राज्य उपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
जयसिंगपूर:- (उमळवाड ता.शिरोळ) राजकारणातील महिलांचा सहभाग हा केवळ नामामात्रअसल्यामुळे त्यांना महिलांच्यासाठी कोणताही ठोस कृती कार्यक्रम राबवता येत नसल्यामुळे महिलांनी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी एकसंघ होऊन लढणे ही काळाची गरज ओळखून त्यासाठी सामाजिक चळवळ ही महिला प्रधान बनवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. साबेरा इंगळे यांनी केले त्या उमळवाड (तालुका शिरोळ) येथे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा सुभाष वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये श्रीमती सुनिता तिवडे रा.उमळवाड (ता.शिरोळ जि.कोल्हापूर) यांची शिरोळ तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन सत्कार प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वरिष्ठ राज्य उपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर होत्या.
सदर कार्यक्रमाचे नियोजन शिरोळ तालुका अध्यक्ष बाळू तिवडे यांनी केले.
यावेळी मंगल तेवढे अनिता तेवढे रेखात एवढे आरती तेवढे स्वाती तेवढे शुभांगी तेवढे वनिता तिवडे, लक्ष्मी तिवडे, रंजना तिवडे, सावित्री तिवडे, समृद्धी आवळे,मंगल तिवडे, अनिता तिवडे, रेखा तेवढे आरती तेवढे स्वाती तिवडे, शुभांगी तिवडे, वनिता तिवडे, लक्ष्मी तिवडे, रंजना तिवडे, सावित्री तिवडे, समृद्धी आवळे, सीमा देवकुळे, जयश्री तिवडे, पूजा तिवडे, शितल तीवडे, वीरश्री तिवडे, रेशमा तिवडे, संगीता महापुरे, कुसुम तिवडे, जयश्री तिवडे, निर्मला तिवडे, वर्षा तिवडे, अभिषेक तिवडे, प्रथमेश तिवडे पांडुरंग तिवडे हर्षल तिवडे, विशाल तिवडे, अक्षय तिवडे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार पांडुरंग तिवडे यांनी मानले.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिरोळ तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी श्रीमती सुनिता तिवडे यांना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन सत्कार करताना कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सौ. साबेरा इंगळे राज्य उपाध्यक्षा सौ. सुनीता खटावकर व इतर


